पिलीव येथील मा.श्री जगन्नाथ बाबुराव जाधव व जाधव परिवाराच्या वतीने सुजित सातपुते यांचा सन्मान : महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड…!

माळशिरस/तालुका प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना,राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना,घरकुल योजना,आरोग्य योजना,यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती,राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,

राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता,पत्रकारांवर होणारे हल्ले,धमकी,मारहाण त्याचबरोबर पत्रकारांच्या इतर विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन,उपोषण,निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक यशवंतराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाध्यक्षपदी सुजित दिगंबर सातपुते यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असल्याने त्यांचा जाधव हॉस्पिटल,जाधव क्लिनिकल लॅब,सोहम मेडिकल व जाधव परिवाराच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,यावेळी सा.बां.वि.चे सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ जाधव, पिलीव ग्रा.पं.सदस्य तथा चेअरमन अविनाश जेऊरकर,भारतीय जनता पार्टीचे पिलीव शहराध्यक्ष राजेंद्र करांडे,डॉ.सागर जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोखंडे,समीर (शेठ) सय्यद,ऋषिकेश भैस,तुषार जाधव यांसह इतर मान्यवर उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *