पत्रकार सुरक्षा समितीचा सोमवारी पत्रकार दिन,अनेक मान्यवरांची उपस्थिती:नूतन पदाधिकाऱ्यांचा होणार सन्मान..!

सोलापूर /प्रतिनिधी

पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दर महा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे
6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून मोठया प्रमाणात साजरा केला जातोय.
पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो या वर्षी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोमवार दिनांक 6/1/2025 रोजी शहरातील समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक येथे दुपारी 12 वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे शहर अध्यक्ष राम हुंडारे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *