शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी शिंदे-निकम यांचा होणार शाही विवाह सोहळा..!
पिलीव/सुजित सातपुते
एक क्षण मंगल प्रहराचा,एक क्षण मेंहदीच्या बहराचा,
एक क्षण लगीन घाईचा,एक क्षण शुभ शहनाईचा,
एक क्षण जन्मगाठीचा,एक क्षण लग्नगाठीचा,
लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर,
तुमची उपस्थिती हाच आमच्यासाठी अनमोल आहेर..!
कै.शामराव बंडा शिंदे यांचे नातू व श्री.हणमंत(शेठ)शामराव शिंदे रा.जांभुळणी,तालुका माण,जिल्हा सातारा यांचे ज्येष्ठ चिरंजीव सागर व कै.भानुदास कोंडीबा निकम यांची नात व श्री.दत्तात्रय भानुदास निकम रा.चांदापुरी तालुका माळशिरस,जिल्हा सोलापूर यांची कनिष्ठ कन्या चि.सौ.का निकिता यांचा मित्ती पौष 4 शके 1946 शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 02 वाजून 56 मिनिटांनी शाही असा शुभविवाह सोहळा संपन्न होणार आहे,सदरच्या विवाहसोहळ्यास Gravillea Capital Ltd व Dotfin Capital Ltd चे ओनर मा. श्री अक्षय (शेठ) शिंदे व मा.श्री समीर (शेठ) सय्यद,पिलीव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,हा विवाह सोहळा म्हसवड-जांभुळणी रोडवर मेगा सिटीच्या समोर असणाऱ्या सारजाई मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे.सदर विवाह सोहळ्याचे निमंत्रण पत्रिकेद्वारे सर्वांना निमंत्रण दिले आहे,परंतु नजर चुकीने कोणी राहिले असेल तर हेच निमंत्रण समजून आपण उपस्थित रहावे,अशी लग्नकार्याचे मालक हणमंत (शेठ) शिंदे मोबा.नं-8888025106/7340252033 यांनी आग्रहाची विनंती केली आहे,