पिलीव येथील चि.ओंकार प्रकाश फलके याची मृदा व जलसंधारण अधिकारी पदी नियुक्ती..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रकाश रंगनाथ फलके व वैशाली प्रकाश फलके-भागवत या आदर्श शिक्षक दाम्पत्याच्या मुलाने पिलीवसह परिसराच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला आहे,चि.ओंकार प्रकाश फलके याने २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती मध्ये पहिल्याच प्रयत्नात मृदा व जलसंधारण अधिकारी पदाला गवसणी घालून घवघवीत यश संपादन केले असून क्लास २ ची पोस्ट मिळवली आहे,

मृदा व जलसंधारण विभागाचे काम म्हणजे मृदा आणि जलसंधारण क्षेत्रातील उपक्रम राबवणे,पाणलोट विकास कार्यक्रमांचे व्यवस्थापन आणि देखरेख करणे,शेतकरी,जमीनमालक आणि समाजातील सदस्यांसाठी मृदा आणि जलसंधारणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे,जमीन मालकांना,कृषी उत्पादकांना माती आणि जलसंधारण पद्धतींवर तांत्रिक सहाय्य देणे,वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाय योजना करणे यासह अनेक शेतकरी हिताच्या कामांचा समावेश असल्याचे चि.ओंकार फलके याने माध्यमांशी बोलताना सांगितले,ओंकारच्या या पहिल्याच प्रयत्नातील भल्या मोठ्या यशाबद्दल त्रिमूर्ती कंट्रक्शनचे सर्वेसर्वा रणधीरजी काटे,नाभिक समाजसेवा संघटनेचे नेते सचिन वाघमारे,राज कलेक्शनचे मालक समीर सय्यद, पिलीव पत्रकार संघ व परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या/पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ओंकार वरती अभिनंदनचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे,
चौकट – मला आज जी काही यश प्राप्ती झाली आहे,त्याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते,माझ्या आई-वडिलांनी मला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी लावल्यानेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे,
चि.ओंकार फलके
नवनियुक्त मृदा व जलसंधारण अधिकारी