नूतन पोलीस उपनिरीक्षक विद्याराणी फाटे यांचा कोळेगांव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार..!

कोळेगांव/सतिश पारसे

कोळेगाव ता माळशिरस येथील विद्याराणी फाटे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल कोळेगाव ग्रामस्थांच्या वतीने वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कोळेगांव ता माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी व वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील कु.विद्या उत्तम फाटे ही पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सन २०२०मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा ईडब्लूएस प्रवर्गातील निकाल राखून ठेवण्यात आला होता. सदर निकाल जाहीर झाला त्यामध्ये विद्या फाटे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागली आहे. कोळेगांवच्या इतिहासात पहिली महिला पोलीस अधिकारी म्हणून विद्याराणी फाटे हिची नोंद झाली आहे,या निवडीमुळे कोळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे व याचा सार्थ अभिमान म्हणून विद्याराणी फाटे हीच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कोळेगाव, फळवणी तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी यांनी उपस्थित राहून विद्याराणी फाटे हिचा सन्मान करून अभिनंदन केले.त्याचबरोबर नुतन पोलीस उपनिरीक्षक विद्याराणी फाटे यांनी आपले विचार व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *