सतीश पारसे यांची कोळेगाव प्रतिनिधी म्हणून निवड..!

पिलीव/प्रतिनिधी
पत्रकार हा समाजाचा एक घटक असतो.त्यामुळे पत्रकारितेसाठी खूप वेगळे गुण लागतात.तुम्हाला जर पत्रकार बनायचे असेल तर समाजाच्या प्रश्नांची जान असणे गरजेचे आहे.एखाद्या ठिकाणी होणारा अन्याय तुम्ही लेखणीच्या माध्यमातून मांडला पाहिजे.पत्रकारितेची पदवी असो किवा पदविका ती नोकरीसाठी आवश्यक आहेच,मात्र तुम्हाला सर्वात आधी बातमी कशाला म्हणतात,ती कशी लिहावी हे समजले पाहिजे. आणि त्यासाठी त्या व्यक्तीची चौकस बुद्धी असणे गरजेचे असते.अशीच एक व्यक्ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या दैनिक नवमित्र या वृत्तपत्राला कोळेगाव प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी अनेक दिवसापासून इच्छुक आहे.त्यांना परिसरातील सामाजिक व राजकीय ज्ञान असून शांत,संयमी व हुशार असल्याचे मुलाखतीत निष्पन्न झाल्याने संपादक सचिन माने यांनी सतीश पारसे या इच्छुक व्यक्तीची बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी कोळेगाव प्रतिनिधी म्हणून अधिकृतरित्या नियुक्ती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *