पिलीव येथील कर्मवीर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा भरला आठवडी बाजार : पालकाचा मिळाला वाढता प्रतिसाद..!
पिलीव/सुजित सातपुते
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव कापसे यांनी सांगितले. शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. ‘भाजी घ्या भाजी…ताजी ताजी भाजी’अशा चिमुकल्यांच्या आरोळ्यांनी बाजारात रंगत आली होती.ग्राहकांनी देखील खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला.ग्रामस्थ, महिलांनी आवर्जून या आठवडे बाजाराला भेट देऊन खरेदी केली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी जवळपास वीस हजार रुपयांची कमाई केली. मुख्याध्यापक शिवाजीराव कापसे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो.बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच,परंतु हाच अनुभव पिलीव येथील मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला.त्यांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची,फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.यावेळी मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला,फळे,चहा स्टॉल,आदी दुकाने शाळेच्या आवारात थाटली होती.बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण,भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर, भाजीपाला मालक व ग्राहक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला.बाजार शाळेतच आल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळत होता.पर्यवेक्षक श्रीमती मोरे मॅडम सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी सदर आठवडा बाजाराचे नियोजन केले होते,