कितीबी समोर येऊ दे त्यांना एकटा बास..!

पिलीव/सुजित सातपुते

गेल्या २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या या लढ्यात अनेक नेत्यांचं योगदान आहे. मात्र कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आरक्षणाचा लढा सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणचा प्रश्न हाती घेतला आहे.त्यामुळं जरांगे पाटील राज्यभरातील मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले असल्याचे अखंड महाराष्ट्राला पहावयास मिळत आहे.याच गोष्टीची तंतोतंत प्रचिती जुळून आली आहे सोलापुरातील एका लढवय्या सैनिकाची ज्या लढवय्या सैनिकाची महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समिती म्हणून एक मोठी संघटना आहे,महाराष्ट्रातील शोषित,वंचित,पीडित व अन्यायग्रस्त पत्रकारांचा आधार म्हणून ज्यांची ओळख आहे,त्या निस्वार्थी लढवय्या सैनिकाचे नाव आहे यशवंत पवार गेल्या ३० ते ३५ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अविरत व अखंडितपणे कोणी लढा सुरू ठेवला असेल तर त्या योध्याचे नाव आहे यशवंत पवार, पत्रकारांवरील होत असलेले हल्ले थांबावे,पत्रकारांना पेन्शन मिळावी,पत्रकारांवर मोफत आरोग्य उपचार व्हावे,पत्रकारांना शासकीय जाहिराती मिळाव्या,पत्रकारांना मानधन मिळावे,पत्रकारांचा शासनाने मोफत विमा उतरावा,न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल वाल्या पत्रकारांना शासकीय मान्यता मिळावी,यासह अनेक छोट्या-मोठ्या पत्रकारांच्या हितांच्या मागणीसाठी आपल्या घरादाराचा देव्हारा करून पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर सलग ३५ वर्षे फिरत असलेल्या यशवंत पवार यांना आज पर्यंत ना कोणत्या खासदाराची गरज पडली ना कोणत्या आमदाराची गरज पडली.केवळ पत्रकारांच्या हितासाठी आज अखेरपर्यंत कितीतरी आंदोलने,कितीतरी मोर्चे,आमरण उपोषणे,निदर्शने केली ती ही कोणत्याही धन दांडग्यांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याविना फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवावर,जे पत्रकार सोबत येतील त्यांच्याबरोबर आणि जे येणार नाही त्यांच्या शिवाय हा अजंठा घेऊनच घेऊनच मैदानात उतरलेल्या एकट्या यशवंत पवार या लढवय्या सैनिकाकडे आज अखंड महाराष्ट्रातील हजारो निस्वार्थी पत्रकारांची फौज आहे,एका व्यावसायिक स्वतंत्र पत्रकारानं अखेरपर्यंत तसंच रहायला हवं,या विचारावरची माझी निष्ठा अढळ आहे.परखड मतं मांडणारा,घडणाऱ्या घटनांचा साक्षीदार,वृत्तांतकार ही आपली ओळख त्यानं जपावी राजकारणाच्या चतुर खेळींमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ नये असं मला वाटतं.ज्यांना राजकारणात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं,पण त्याआधी त्यानं पत्रकारितेवर पाणी सोडावं असं आपल्या संघटनेतील पत्रकारांना ठामपणे छाती ठोकून सांगणाऱ्या यशवंत पवार या संघर्ष योध्याला आजपर्यंत कोणतीही ताकद विकत घेऊ शकली नाही,त्यामुळेच अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणावं वाटतं वाटतं कितीबी समोर येऊ दे त्यांना “यशवंत पवार” एकटा बास…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *