पिलीव येथे जय श्रीरामच्या जयघोषात मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा..!

पिलीव/सुजित सातपुते

आयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य दिव्य श्री राम मंदिरात राम ललाची प्रतिष्ठापना हा ऐतिहासिक समारंभ संपन्न होत आहे.या ऐतिहासिक समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी संपूर्ण देशभर आयोध्येतून पवित्र पूजीत अक्षता कलाशाचे आगमन झाले आहे.याच अक्षता कलाशाची आज शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता माळशिरस तालुक्यातील पिलीवच्या मुख्य पेठेतून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.

प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेली टुमदार पालखी, हलगी व ढोल ताशांचा गजर,शंखांचे वादन,’जय श्रीराम’चा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करीत एसटी स्टँड पासून ते हनुमान मंदिरापर्यंत भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली.यावेळी पिलीव पंचक्रोशीतील महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या.यात्रेचे पिलीव पेठेतील दुकानदारांकडून ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.सदरच्या अक्षता कलशाचे पावित्र्य राखण्यासाठी व शोभायात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पिलीव सह परिसरातील अनेक तरुणांनी परिश्रम घेतले.

श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पुढील महिन्यात होत आहे.या पार्श्‍वभूमीवर आज आपल्या पिलीव गावामध्ये मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. #अतुल आर्वे,पिलीव

                 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *