कोळेगांवच्या विद्या फाटे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

कोळेगांव प्रतिनिधी- सतिश पारसे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कोळेगांव ता माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी व वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील कु.विद्या उत्तम फाटे ही पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सन २०२०मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा ईडब्लूएस प्रवर्गातील निकाल राखून ठेवण्यात आला होता. सदर निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये विद्या फाटे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागली आहे.

विद्या फाटे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाघडोहवस्ती येथे तर आठवी ते दहावी विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव,ज्युनिअर कॉलेज सांगोला विद्यामंदिर तर महाविद्यालयीन शिक्षण सांगोला कॉलेज सांगोला ,तसेच एम एस सी चे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले आहे.तर पुणे येथे एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आहे.विद्या फाटे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे कळताच फाटे परिवाराकडून सर्व ग्रामस्थांना पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *