विकसित भारत संकल्प यात्रेला माळशिरस तालुक्यात चांगला प्रतिसाद

पिलीव/प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत देशात सुरू असलेल्या योजनांचा तळागाळातल्या जनतेला फायदा व्हावा मोदी सरकारने राबविलेल्या चांगल्या योजनांचा प्रत्येकाला फायदा मिळावा या उद्देशाने संपूर्ण भारत देशात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या यात्रेला माळशिरस तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आमदार रामभाऊ सातपुते भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील भैया मोहिते पाटील गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात रोज दोन गावे याप्रमाणे यात्रा सुरू आहे संकल्प यात्रेत विविध योजनांची माहिती दिली जाते लाभार्थ्यांचा सन्मान केला जातो ड्रोनच्या साह्याने फवारणीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले जाते शेतकऱ्यांचाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे मोदी सरकारने पीएम किसान योजनेसारख्या चांगल्या योजना राबविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे विकसित भारत संकल्प यात्रा आज तरंगफळ या ठिकाणी आली असता या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच सौ पद्मिनी नारायण तरंगे नारायण तात्या तरंगे पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष सुजित तरंगे तालुका सरचिटणीस संजय देशमुख माजी उपसरपंच सतीश कांबळे दिव्यांग संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे उज्वला लाभार्थी यमुना तरंगे पीएम किसान लाभार्थी रावसाहेब तरंगे यांचे सह ग्रामस्थ सर्व विभागाचे शासकीय अधिकारी शिक्षक शेतकरी लाभार्थी विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांचे स्वागत करून ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक करून सर्वांना विविध योजनांची माहिती देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *