ॲड.शांतीलाल तरंगे यांची जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत बाजी..!

पिलीव /सुजित सातपुते
महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पिक स्पर्धेत बाजरी या पिकासाठी माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील ज्येष्ठ विधीज्ञ व प्रगतशील बागायतदार ॲड.शांतीलाल उत्तमराव तरंगे यांचा द्वितीय क्रमांक आला असून त्यांनी बाजरीचे योग्य नियोजन करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.याचीच दखल घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने त्यांना द्वितीय क्रमांक घोषित केला आहे.ॲड.तरंगे यांनी तरंगफळ गावासाठी जलसंधारण व विविध विकास कामांसाठी भरीव काम केले आहे.जलयुक्त शिवार योजना तरंगफळ परिसरात राबविण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग,जलसंधारण विभाग,वन विभाग यांच्या माध्यमातून अनेक कामे केल्यामुळे तरंगफळ गावाला जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.अशा वेगवेगळ्या पुरस्कारांच्या माध्यमातून गावाच्या वैभवात भर टाकण्यासाठी ॲड.तरंगे यांचे खूप मोठे योगदान असल्याचे रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *