आयुष्यमान भारत या योजनेचे गोल्डन कार्ड काढण्याचा मेघा कॅम्प संपन्न,डॉ.विलास जाधव यांनी केले होते आयोजन : एका दिवसात २०३ लोकांची झाली नोंदणी..!

पिलीव/सुजित सातपुते
महाराष्ट्र राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम चालू आहे.याच मोहिमे अंतर्गत आज माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक केंद्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव येथे आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून देण्याचा मेगा कॅम्प भरविण्यात आला होता.आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविली जात आहे.देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत.या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात.केंद्राने २०१८ पासून या योजनेला सुरूवात केली आहे.परंतु महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब व गरजू लोक या योजनेपासून वंचित राहिले आहेत.या आयुष्यमान भारत योजनेची सर्वसामान्य गोरगरीब व गरजूंपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी आम्ही अगदी कसोटीने प्रयत्न करत आहोत मात्र विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाजसेवक यांनीही सोशल मीडियाच्या किंवा इतर कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या योजनेबद्दल जनजागृती केली पाहिजे.आज आम्ही पिलीव परिसरातील एकूण २०३ लोकांना आयुष्यमान भारत या योजनेचे गोल्डन कार्ड काढून दिली असल्याचे डॉ.विलास जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास जाधव यांना रुग्णसेवेचे व समाजसेवेचे वेड असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.वैद्यकीय क्षेत्रात असे खूप कमी लोक पहावयास मिळतात,

नितीन मोहिते-माळी लोकनियुक्त सरपंच,पिलीव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *