पुण्यतिथी,वाढदिवस साजरे करताना समाज उपयोगी उपक्रम राबवावे – निवासी नायब तहसीलदार केशव तरंगे

पिलीव/प्रतिनिधी

पुण्यतिथी वाढदिवस साजरे करीत असताना वायफट खर्च करण्यापेक्षा समाज उपयोगी उपक्रम राबवून पुण्यतिथी वाढदिवस साजरे करावेत असे प्रतिपादन माजी निवासी नायब तहसीलदार केशव तरंगे यांनी काढले ते कै रामराव गेनू तरंगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमासाठी तरंगफळ चे सरपंच नारायण तात्या तरंगे दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर माजी सरपंच सुजित तरंगे भानुदास जानकर सचिन ओलेकर बाजीराव तरंगे विलास तरंगे संपत साळवे वीरकर सर लवटे सर योगेश तरंगे वैभव करमारे शिक्षक स्टाफ ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तरंगे परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ तसेच वाघमोडे वस्ती आणि मोठेवाडी सटवाई वस्ती या ठिकाणी शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला अनेकांनी तरंगे परिवाराचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *