असंविधानिकपणे वागणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा – मिलिंद सरतापे
पिलीव/सुजित सातपुते
महाराष्ट्र शासन,सोलापूर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांचे संविधान दिन साजरा करण्याचे आदेश असतानाही माळशिरस तालुक्यातील काही अपवाद वगळता इतर कामचुकार अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.२६ नोव्हेंबर रोजी शासन निर्णयाचा अवमान करून संविधान दिवस साजरा न करणाऱ्या कार्यालय प्रमुख व अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) माळशिरस तालुका यांच्यावतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तहसील कार्यालयासमोर पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय,शासकीय कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात यावा असा आदेश असतानाही माळशिरस तालुक्यातील रजिस्टर ऑफिस,पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी,विविध विभागांचे प्रमुख अधिकारी,तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज,सहकारी संस्था निबंध कार्यालय,निरीक्षक वजन माफी कार्यालय,सहाय्यक रजिस्टर कार्यालय अकलूज,राज्य उत्पादन शुल्क विभाग,अकलूज मंडळ कृषी कार्यालय,लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालय अकलूज,तसेच लवंग मंडल कार्यालय,तांबवे तलाठी कार्यालय,वेळापूर तलाठी कार्यालय,मंडळ कार्यालय,माळशिरस नगरपंचायत उघडलीच नाही.अकलूज नगरपरिषद,महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत,नातेपुते नगरपंचायत येथे मुख्य अधिकारी उपस्थित राहिले नाहीत.ग्रामपंचायत उंबरे दहिगाव, वाघोली,डोंबाळवाडी, चांदापुरी तलाठी कार्यालय,आदी कार्यालयात ग्रामसेवक तलाठी उपस्थित राहिले नाहीत.तसेच बर्याच शाळा, कार्यालय यांनी संविधान दिवस साजरा केला नाही.महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून सुद्धा अधिकारी गांभीर्यपूर्वक दखल घेत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे.भारताचे संविधान हे विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महीने आठरा दिवस परिश्रम करून लिहिले आणि भारत देशाला दिले आहे.

परंतु संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्याचा अधिकाऱ्यांचा खोडसाळ प्रयत्न असावा असा आम्हाला प्रश्न पडल्याने आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवून माळशिरस तहसीलदार यांच्यामार्फत पालकमंत्री यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत.संविधान दिवस साजरा करण्याबाबत दि२४नोव्हेंबर२००८ शासन निर्णयानुसार दरवर्षी विविध उपक्रमाने हा संविधान दिवस साजरा करायचा आहे असे असताना भारतीय संविधान संविधान दिनाबद्दल अनास्था दाखवणाऱ्या अशा मग्रुर मुजोर अधिकारी कार्यालय प्रमुख यांच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने सात रस्ता सोलापूर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी.अशा आशयाचे निवेदन माळशिरस निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांनी स्वीकारले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन.के साळवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव दयानंद धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले,जिल्हा संघटक तुकाराम बाबर,जिल्हा उपाध्यक्ष एस.एम गायकवाड,जिल्हा सचिव रमेश धाईंजे,आबा बनसोडे,नितीन मोरे,तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,सरचिटणीस मारुती खांडेकर,कार्याध्यक्ष समाधान भोसले,प्रवीण साळवे,विनोद रणदिवे,पोपट गेजगे,शेखर सावंत,संतोष कांबळे,बापूसाहेब पोळके,रामभाऊ कांबळे,संजय भोसले,अण्णासो भोसले,महादेव गायकवाड,मारुती शिंदे,अजितदादा मोरे,सुचित साळवे,अशोकभाऊ बनसोडे,दादासाहेब नामदास,वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे,महेंद्र साठे,जावेद मुलाणी,अभिजीत केंगार,विजय बनसोडे,राहुल सराटे,जब्बार मुलाणी,हनुमंत वायदंडे,हार्षद धाईंजे,सुनील ओवाळ,वरून धाईंजे,आकाश झेंडे,पंकज भोसले,अण्णासो निकंबे,प्रवीण देठे,अभिजीत वाघमारे,स्वप्निल सरवदे,रोहन ओवाळ,प्रकाश कांबळे,अतिशय आठवले,नितीन जाधव,किशोर आठवले,राहुल गायकवाड,सुधीर भोसले,राजू खरात,अनिल गायकवाड,राहुल सातपुते,संतोष बनसोडे,गणेश साठे,दिलीप भोसले,प्रशांत बनसोडे,सद्दाम तांबोळी,नवनाथ माने,आदी पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी तहसील कार्यालयाकडून पुढील वरिष्ठांकडे कारवाईचे पत्र पाठविल्याचे पत्र आंदोलन स्थळी नायब तहसीलदार यांनी दिले.यावेळी माळशिरस पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रस्ता रोकोच्यावेळी सर्व रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर बसले होते,भर दुपारी १२ च्या दरम्यान सूर्यदेव माथ्यावर आला असल्याने डांबरी रस्ता तळपत होता. मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप जनक तीव्र अशी घोषणाबाजी सुरू होती.परंतु अचानकपणे रस्त्यावरून एक सायरन वाजवीत ॲम्बुलन्स आल्याने एका क्षणात रस्ता रोकोची गर्दी दुभंगली व ॲम्बुलन्स ला वाट काढून दिली.यातच रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची शिस्त दिसून आली.