बार्टीने एक लाख संविधानप्रती उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासु – वैभवजी गीते

पिलीव/प्रतिनिधी
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे 6 डिसेंबर 2023 रोजी व 1 जानेवारी 2024 रोजी भीमा कोरेगाव येथे बार्टीच्या वतीने एक लाख संविधानप्रती उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असलेबाबतचे लेखी निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना दिले आहे.सदर निवेदनात नमुद केल्या प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ( बार्टी ) यांच्यामार्फत भारतीय संविधानाच्या प्रती नाममात्र दरात उपलब्ध केल्या जातात.चैत्यभूमी व भिमा कोरेगाव येथे बार्टीच्या शासकीय स्टॉलवरून संविधानप्रती घेण्यासाठी दोन्ही ठिकाणी लाखो अनुयायी येतात.परंतु बार्टीकडून संविधानाच्या प्रती अल्प प्रमाणात छापल्याने दोन तासात संविधानाच्या प्रती संपून जातात.

आणि बार्टीचे अधिकारी व विभागप्रमुख,कर्मचारी संविधानप्रती संपल्या आहेत अशी उत्तरे देतात हे प्रत्येक वर्षीचे रडगाणे आहे.
जाणूनबुजून बार्टीचे महासंचालक व विभाग प्रमुख हे भारतीय संविधानाच्या फोटोझिंको प्रिंटिंग प्रेस मधून कमी प्रती छापून घेतात.त्यामुळे प्रती तात्काळ संपतात आणि भारत भरातून आलेली आंबेडकरी अनुयायी इच्छा असुनही सविंधानाच्या प्रती विकत घेऊ शकत नाहीत व त्यांच्या पदरी निराशा येते.या सर्व बाबींची माहिती महासंचालक व विभाग प्रमुख यांना माहिती असतानाही प्रत्येक वर्षी जाणून बुजून कमी प्रती छापून घेऊन आंबेडकरी आणुयायांना संविधानांच्या प्रतींपासून वंचित ठेवतात ही बाब गंभीर आहे.
यामुळे बार्टीचे महासंचालक व विभाग प्रमुख यांनी चैत्यभूमी येथे 6 डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवरील स्टॉलवर तर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील स्टॉलवर भारतीय संविधानाच्या प्रती व बाबासाहेबांचे खंड प्रत्येकी एक लाख प्रति छापाव्यात तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले मराठी भाषा अनुवादित केलेले सर्व खंड छापून घ्यावेत.बार्टीच्या स्टॉलवर नाममात्र शासकीय किंमतीत विक्रीसाठी ठेवावेत.संविधानमध्ये आजपर्यंत झालेले सर्व बदल,संशोधन नवीन आवृत्तीसह छापून घ्याव्यात व यापुढे संविधान प्रती व बाबासाहेबांचे खंड संपलेले आहेत.असे उत्तर विभाग प्रमुख व संबंधीत कर्मचारी यांच्याकडुन दिल्यास व कर्तव्यात कसूर झाल्यास बार्टीच्या पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर असणाऱ्या विभाग प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(बार्टी) च्या मुख्यालयात महासंचालक सुनील वारे यांची समक्ष भेट घेवुन दिले आहे.या निवेदनाची गांभिर्याने दखल घेवुन पुर्तता करण्याचे अश्वासन महासंचालक सुनील वारे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *