अवघड अशी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.गुळभिले दांपत्याचा अविनाश जेऊरकर मित्र परिवाराच्या वतीने सन्मान व कौतुक..!
पिलीव/ सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे अनेक वर्षापासून अविरतपणे सेवा देणारे डॉ.मिलिंद गुळभिले यांचे अक्षय हॉस्पिटल अखंडितपणे कार्यरत आहे. तेच अक्षय हॉस्पिटल सध्या पिलीव परीसरातील सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरत आहे.कारण डॉ.तुषार गुळभिले व डॉ.सायना गुळभिले यांनी तब्बल सव्वा दोन तास अवघड असलेली शस्त्रक्रिया करुन पिलीव येथील एका गरीब कुटुंबातील महिलेच्या पोटातुन साडे दहा किलोची गाठ काढली आहे. पिलीवसारख्या ग्रामीण भागातील ही पहिलीच अशी अवघड शस्त्रक्रिया झाली आहे.

सदर महिलेची तब्येत एकदम ठणठणीत असुन सर्व तपासण्या चांगल्या आल्या आहेत. डॉ.तुषार गुळभिले व डॉ.सायना गुळभिले यांनी एका गरीब पेशंटची एकदम अवघड शस्त्रक्रिया करुन साडेदहा किलोची गाठ काढुन सर्व सामान्य,पती नसणाऱ्या महीलेला जिवदान दिल्यामुळे पिलीव ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर मित्र परिवाराच्या वतीने डॉ.गुळभिले दांपत्याचा पुष्पहार,शाल,श्रीफळ व फेटा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ॲड.वैभव मेथवडे,नाना मदने,शुभजीत नष्टे,योगेश देशमुख, श्याम उपाध्ये,ओंकार आर्वे,अफजलखान पठाण यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मी माझ्या मुलाला पिलीव व परिसरातील गोरगरिब व गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर बनविले आहे.काल झालेल्या शस्त्रक्रियेने माझ्या मुलाने माझ्या कष्टाचे चीज बनवले यातच माझे समाधान आहे.
डॉ.मिलिंद गुलभिले, पिलीव