कर्मवीर विद्यालयात संविधान दिन साजरा : रिपाइं व प्रज्ञा ई-सेवा केंद्राच्यावतीने फळे वाटप..!

पिलीव/सुजित सातपुते
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधानिक मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयांमध्ये सत्यवान वाघमारे सर यांनी आपल्या स्वलिखित गीतातून तर विद्यालयातील मुला-मुलींनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले.सदर प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) तालुका उपाध्यक्ष रणजीत सातपुते व प्रज्ञा ई-सेवा केंद्राच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली.यावेळी गोविंद वाघमारे,सचिन वाघमारे, प्रफुल्ल वाघमारे,अजित सातपुते,नागेश सातपुते,झाडे सर,इंगळे,पाटील जाधव,ठाकर यासह शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *