कुत्र्याचा दुखवटा पाळणारं अकलूज येथील धाईंजे कुटुंब: स्टफी नावाच्या कुत्रीने सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून नेहला..!

पिलीव/सुजित सातपुते-
आपल्या स्वभावातील प्रामाणिक वृत्तीसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय पाळीव प्राणी म्हणजे अर्थात कुत्रा,प्राचीन काळापासून कुत्रा हा प्राणी पाळला जातो. राखणदार व प्रामाणिक स्वभावामुळे आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही सामान्यपणे कुत्र्याची वैशिष्टये म्हणता येतील.जगात असे मोजकेच प्राणी आहेत जे माणसांच्या अगदी जवळ राहतात.त्यापैकी कुत्रा हा एक असा प्राणी आहे जो माणसांवर खूप प्रेम करतो आणि माणूसही कुत्र्यांवर तितकेच प्रेम करतो.जगात जर लोक सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे संगोपन करत असतील तर तो कुत्रा आहे.याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची निष्ठा ते आपल्या मालकाशी इतके एकनिष्ठ असतात की त्यांच्यासाठी ते आपल्या प्राणांची आहुती देतात.तसं तर कुत्रेही खूप वेगवान असतात त्यांना काही शिकवलं तर ते पटकन शिकतात.

अशीच एक कुत्री (मादी) होऊन गेली आहे ती म्हणजे माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील रहिवाशी असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण धाईंजे उर्फ के.डी व त्यांची पत्नी सौ.शितल धाईंजे यांची स्टफी नावाची डॉबर मॅन जातीची कुत्री या स्टफी वरती धाईंजे परिवाराचे शब्दात न सांगण्याइतके प्रेम होते.तिला पोटाच्या मुलाप्रमाणे घरात वागणूक दिली जात होती.घरातील सदस्यांना जेवण असेल तेच जेवण स्टफिला मिळत होते स्टफिला वेगळी अशी खोली नव्हती ती बेडरूम मध्ये बेडवरच झोपून असायची,आपल्या परिवारातील सदस्यावर कोणी हात टाकला तर स्टफी समोरच्या माणसाच्या अंगावर धावून जायची रात्री अपरात्री आपला मालक आला तर मालकाने दार वाजवल्यानंतर स्टफी आपल्या तोंडाने आतील कडी उघडायची इतक्या लाडाची व समजूतदार असूनही अगदी दिवाळीच्या तोंडावरच सणासुदीच्या काळात स्टफि आजारी पडली तिने खाणे-पिणे सगळे काही सोडले हा सर्व प्रकार किरण धाइंजे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्टफिला लागलीच दवाखान्यात हलवले,व त्वरित उपचार सुरु केले परंतु डॉक्टरांच्या हलगर्जी पणाने बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर रोजी धाईंजे परिवारावर काळाने घावा घातला व स्टफीचा दुर्दैवी अंत झाला.स्वतःचे मित्र,नातेवाईक,अज्जी,व इतर जवळचे किती लोक मेले तरीही कधी डोळ्यात पाण्याचा एक थेंबही आला नाही.परंतु आपली स्टफी आपल्याला सोडून गेली हे समजताच किरण धाईंजे यांचे अश्रू आणावर झाले व त्यांनी टाहो फोडला.एवढेच नाही तर त्यांची पत्नी सौ.शीतल धाईंजे व मुलेही ढसा-ढसा रडू लागली आपल्या घरातील एक सदस्यच मयत झाला आहे.असे समजून त्यांनी स्टफिला आपल्या घरासमोरच दफन केले व तिसऱ्या दिवशी विधीवत पूजा करून स्टफिला सर्व कुटुंबाच्या समावेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.स्टफीच्या जाण्याने धाईंजे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.घरातील सदस्य गेल्या प्रमाणेच दिवाळी साजरी न करता,नवीन कपडे न घेता दुखावटा पाळाला घरातील माणूस गेला तरी आज-काल लोक दोन दिवसात विसरून जातात परंतु स्टफी जाऊन आज दहा दिवस झाले तरी आजही स्टफीचा दुखवटा हा धाईंजे परिवाराच्या चेहऱ्यावर दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे.

चौकट

मी माझ्या स्टफिला माझ्या पोटच्या मुलांपेक्षाही जास्त जीव लावला होता.मी व माझ्या पतीने तिला प्राणी म्हणून नाही तर एक आपले लेकरू म्हणूनच सांभाळले होते.त्यामुळे स्टफी आयुष्यभर आमच्या स्मरणात राहील.

सौ.शितल किरण धाईंजे,अकलूज

          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *