सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली लेबर अलाईंस फोरम च्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी रणजित सातपुते यांची निवड : लोकहिताच्या कामाची मिळाली पोहोच पावती..!
पिलीव/प्रतिनिधी
सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली ही एक नामांकित संघटना असून या संघटनेत अनेक सेवानिवृत्त आय.ए.एस व आय.पी एस अधिकारी कार्यरत आहेत,या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर अनेक समाजहिताची व लोकहिताची कामे होत असल्याचे पहावयास मिळत आहे.संघटनेत काम करण्याची इच्छा असेल तर समाज हिताचे भान राखून काम करणाऱ्या सदस्यालाच प्रथमता प्राधान्य असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रणजीत दिगंबर सातपुते यांना अनेक वर्षापासून लोकहिताची व सामाजहिताची कामे करत असताना मी पाहिले असून या कामाची पोच पावती म्हणूनच कामगार आघाडी मंच जिल्हाध्यक्षपदी रणजित सातपुते यांची निवड केली असल्याचे डॉ.लोंढे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील असंघटीत कामगार,बांधकाम,शेतमजूर, ऊसतोड,बंधपत्रित कामगार अथवा कोणत्याही विभागातील कामगारांवर अन्याय,अत्याचार होत असेल त्यांचे हक्क,अधिकार डावलले असतील,किमान वेतन व शासकीय लाभ मिळत नसतील तर आपण जिल्हा अध्यक्ष रणजित सातपुते यांचेशी संपर्क करा ते तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा आशावादही त्यांनी निवडीचे पत्र देताना व्यक्त केला.यावेळी सत्यवान वाघमारे सर,बाळासाहेब जाडकर,कुबेर कपने,संतोष देशमुख , गोविंद वाघमारे ,सागर काटे ,बापूराव कांबळे, अजित सातपुते ई मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.लोंढे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे.त्या विश्वासास तडा न जाऊ देता.संघटनेशी प्रामाणिक राहून लोकहिताची कामे करत राहीन. #रणजीत सातपुते, पिलीव