अवघ्या वीस रुपयाच्या विम्यावर विधवा महिलेस मिळाले दोन लाख रुपये: बी.सी रमेश शिखरे यांची सतर्कता आली कामाला..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील नितीन बाळासाहेब गायकवाड यांचे काही दिवसापूर्वीच प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते.नितीन गायकवाड यांचे पिलीव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये चालू सेव्हींग्जचे खाते होते.सदरच्या खात्यामधून पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वर्षाला २० रुपये प्रीमियम याप्रमाणे पैसे कट करून बिजनेस करस्पॉन्डंट रमेश शिकारे यांनी नितीन गायकवाड यांचा विमा उतरविला होता.त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पिलीव येथील बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ शाखा प्रबंधक दीपक खटके यांनी नितीन गायकवाड यांच्या पत्नी स्वाती गायकवाड यांना बँकेमध्ये बोलावून घेऊन सदरच्या योजनेबद्दल माहिती सांगितली व आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी करून स्वाती गायकवाड यांना पैसे मिळवून देण्याच्या सकारात्मक बाजूने पाठपुरावा केला.परवा मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाती गायकवाड यांना सदर विम्याची दोन लाख रुपये एवढी रक्कम दीपक खटके व पालवे साहेब यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.यावेळी कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे, जॉन सर,राजेंद्र मोठे,अमित गांधी, माऊली बोडरे, रमेश शिकारे उपस्थित होते.यावेळी सर्वच बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वर्षाला २० रुपये प्रमाणे प्रीमियम भरून घ्यावा असे दीपक खटके यांनी आवाहन केले.सदर योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासत नाही.फक्त आपल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये खाते उघडा व वर्षाला २० रुपये प्रमाणे प्रीमियम भरून आपला विमा उतरवून घ्यावा असेही यावेळी खटके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *