स्वच्छतेसाठी एक तास या उपक्रमांतर्गत कर्मवीर विद्यालयाचे झटले शेकडो हात : अतुल पाटील सर यांच्या पुढाकाराने परिसर झाला चकाचक..!
पिलीव/सुजित सातपुते
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या देशव्यापी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १ ऑक्टोबरला राज्यात सर्वत्र नागरी तसंच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास” या उपक्रमांतर्गत प्रत्येकाने ते असतील तिथं स्वच्छता,साफ-सफाई करून या अभियानात सहभाग घ्यावा. गावा-गावांमध्ये,शहरात,प्रत्येक विभागात सकाळी १० वाजल्यापासून या मोहिमेची सुरवात झाली होती.याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून मुख्याध्यापक शिवाजीराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसाठी एक तास या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून पिलीव येथील बस स्थानक परिसर,विद्यालयाचा परिसर त्याचबरोबर पिलीव आउट पोस्टचा परिसर स्वच्छ करून विद्यालयाचे लोकप्रिय शिक्षक अतुल पाटील सर यांनी स्वच्छते विषयी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना महत्त्व पटवून दिले.या उपक्रमामध्ये कर्मवीर विद्यालयाचे विक्रम पाटील,शरद इंगळे,राजेश झाडे,राजू ढोले,प्रकाश जाधव,ग्रामस्थ सचिनसिंग भैस,वसीम बागवान,कर्मचारी उमेश रसाळ,विद्यार्थी गायत्री सूळ,पायल जामदार,साक्षी बाबर,विनोद जाधव,रोहित नवले,सुरेश पडळकर यांसह अनेक विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी वृंद त्यांचे शेकडो हात स्वच्छतेसाठी राबले.कर्मवीर विद्यालयाच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बस स्थानकाचा परिसर स्वच्छ केल्याने तात्पुरती का होईना पण परिसराला चकाकी आली होती.अशी चकाकी कायमची ठेवायची असेल तर विद्यार्थी व शिक्षकांवर अवलंबून न राहता पिलीव गावच्या ग्रामस्थांनी आपला परिसर कसा स्वच्छ राहील याची काळजी घेणे अगदी गरजेचे असल्याचे दिसून आले.
#पिलीव येथील कर्मवीर विद्यालयाचे विद्यार्थी कोणत्याही सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.आज विद्यार्थ्यांनी गावातील कचरा साफ केला आहे हेच विद्यार्थी उद्या महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा कचरा साफ करतील.
डॉ.तुषार गुळभिले
अक्षय हॉस्पिटल,पिलीव