वसंतराव नाईक महामंडळातर्फे कुसमोड येथील वीस लाभार्थ्यांना वीस लाख रुपये थेट बिनव्याजी कर्ज बँक खात्यात जमा मा. धैर्यशील मोहिते-पाटील
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील वीस लाभार्थ्यांना वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती महामंडळाकडून कृषी संलग्न व मध्यम उद्योग व्यवसायासाठी व गोरगरीब लोकांचे आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून शेळीपालन मेंढी पालन तसेच विविध छोटी व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले आहे हे कर्ज पूर्णपणे बिनव्याजी आहे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे भाजपा संघटन महामंत्री मा. धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश होनमाने -(सरचिटणीस-भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका). पोपट कचरे- (ग्रामपंचायत सदस्य) देविदास धायगुडे-( युवा नेते )अनिल धायगुडे- (प्रगतशील बागायतदार) यांनी पाठपुरावा केला सर्वसामान्य लोकांचे व्यवसायातून सुधारणा व्हावे यासाठी एक लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहे त्यामुळे कुसमोड मधील गरीब लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी कुसमोड मधील डॉक्टर उत्तमराव सरगर साहेब बाळासाहेब धायगुडे (ग्रामपंचायत सदस्य) महादेव बंडगर नारायण चव्हाण शशिकला लोखंडे- ( मा. सरपंच) जगदीश गायकवाड चंद्रकांत पवार नभाजी मदने विकास सरगर( पोलीस पाटील )अरुण पवार दादासाहेब पवार पोपट काळभोर दादा विलास लोखंडे बाळासाहेब कपने रावसाहेब बंडगर सचिन होनमने उमेश सरगर लक्ष्मण देवकाते दिगंबर चौगुले सुनील नितीन मोरे बोडरे बापूराव बोडरे नितीन लेंगरे अण्णा कचरे दत्तात्रय जाधव अक्षय मोरे तसेच इतर लोकांचे सहकार्य लाभले.