तरंगफळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेने पटकविला उत्कृष्ट शाळा पुरस्कार..!
पिलीव/प्रतिनिधी
सहकार तपस्वी ब्रह्मदेव दादा माने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आचार्य दादासाहेब दोंदे उत्कृष्ट शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ यांना मा श्री.माजी आमदार दिलीप माने यांच्या शुभहस्ते आज सोलापूर येथे मिळाला.यावेळी पुरस्कार स्वीकारताना सरपंच नारायण तात्या तरंगे,मुख्याध्यापक दिगंबर इरकर,केंद्रप्रमुख राजेंद्र गोरवे,माजी सरपंच सुजित तरंगे,दिव्यांग नेते गोरख जानकर,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष युवराज नरूटे,शिक्षण प्रेमी बाजीराव तरंगे,माजी उपसरपंच शशिकांत साळवे,सदस्य माणिक बागाव,कांतीलाल मोहिते,तानाजी कळकुंबे सर,रंगाप्पा घोळ सर,नितीन पाटील सर आदी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.