गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा या किट चे वाटप..!

पिलीव/सुजित सातपुते

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधा किटचे वाटप माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे वाटप करण्यात आले.सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान मालक श्री एम.यु तरंगे माजी अध्यक्ष स्वस्त धान्य दुकान संघटना माळशिरस तालुका या ठिकाणी तरंगफळच्या लोकनियुक्त सरपंच सौ.पद्मिनी नारायण तरंगे यांचे उपस्थितीत लाभार्थ्यांना वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी दक्षता कमिटी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री एम.यु तरंगे यांनी सांगितले की आनंदाचा शिधा वाटप रोज दुकानात सुरू राहील 30 तारखेपर्यंत सर्वांनी आपापला आनंदाचा शिधा किट घेऊन जावे.
यावेळी सरपंच सौ पद्मिनी नारायण तरंगे,स्वस्त धान्य दुकान संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष महादेव तरंगे,भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे माळशिरस तालुका सहसंयोजक सुजित तरंगे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीमती जोगूबाई मारुती जानकर,माजी उपसरपंच सतीश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते नारायण तात्या तरंगे,विलास तरंगे,महादेव गोरड,अण्णा तरंगे,शहाजी तरंगे,लक्ष्मण तरंगे,शशिकांत साळवे,नानासो कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *