पठाण वस्तीचा सरपंच हिरोला पडतोय भारी..!

पिलीव/सुजित सातपुते –
महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांला लोकसेवक या नात्याने गावातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.गावाला समृद्ध करून विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची जबादारी सरपंचावर असते.त्यानूसार शासनाने सरपंचाला इतर पदाधिकारींपेक्षा विशिष्ट अधिकार प्रदान केलेले असतात आणि त्या अधिकारांसोबत गावविकासाच्या दृष्टीने सरपंचाची कर्तव्य व जबाबदारीचा भारही शासनाने त्याच्यावर सोपविला असतो.त्याप्रमाणे तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून जबादारी पार पाडत असतो.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलमात सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये यासंबंधी माहिती दिली आहे. तसेच,अधिननियमान्वये ग्रामसूचीत नमूद केलेली कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची असते.परंतु ग्रामसूचीच्या पलीकडे जाऊन ही गावच्या वैभवात भर टाकण्यासाठी व गावातील विकास कामांसाठी ध्येय वेडे झालेले माळशिरस तालुक्यातील पठाण वस्ती या गाव चे सरपंच म्हणजे “एजाज फैजखान पठाण” होय.या पठाणवस्ती गावामध्ये एकूण फक्त दीड हजार मतदान आहे. एजाज पठाण हे लोकनियुक्त सरपंच होऊन अवघे नऊ महिने झाले आहेत.परंतु त्यांनी गावांमध्ये विकास कामाची जणू खैरातच वाटली आहे की काय असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.सन १९८९ साली पठाण वस्ती ग्रामपंचायतची स्थापना झाली.स्थापना होऊन तब्बल ३४ वर्षे झाली परंतु गावात आठवडी बाजार भरत नव्हता त्यामुळे गावकऱ्यांची खूप हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन प्रथम पाठपुरावा करून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात आठवडी बाजार सुरू केला.लाडे वस्ती पूल,मगर वस्ती पूल,गावामध्ये १४ हाय मास्ट,कब्रस्तानचे वॉल कंपाऊंड,बौद्ध समाज मंदिर,ढोर समाजासाठी समाज मंदिर,टकले बाबा या देवस्थाना पुढे सभामंडप,ग्रामपंचायत कार्यालयाचे फर्निचर व सुशोभीकरण,अंगणवाडी व जिल्हा परिषदेचे शौचालय,अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेला सोलर प्लांट व प्रोजेक्ट रिपोर्टर,अंगणवाडी किचन शेड,गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते,वाड्या वस्तीवरील काही अपवाद वगळता इतर समाजासाठी सामाजिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मोठ्या भांड्यांचे सेट वाटप,स्टेटलाईट,पठाण वस्ती ते लाडी वस्ती रस्त्याचे काम किंवा अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेली पवार वस्ती असेल या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय यासह अनेक इतर छोट्या-मोठ्या विकासकामासाठी आमदार,खासदार,मंत्री यांच्याकडून निधी खेचून आणण्यासाठी एजाज पठाण यांचा माळशिरस,सोलापूर,मुंबई या ठिकाणी जाऊन सतत पाठपुरावा चालू असल्याचे पहावयास मिळत असते.त्यांच्या कामाची,बोलण्याची,वागण्याची पद्धत पाहूनच गावातील ग्रामस्थांनी त्यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून खांद्यावर घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे.कसल्याही प्रकारचा पक्षपात मनात व डोक्यात न ठेवता विरोधकांची ही आपलाच म्हणून ते अगदी पसंती देऊन काम करत असतात त्यामुळे विरोधकांच्याही मनात ते घर करून राहिले आहेत.अवघ्या दीड हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये या सरपंचाने विकास कामांचा अगदी धडाका लावला आहे.त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही एजाज पठाण यांच्यासारखाच आमच्याही गावाला सरपंच लाभावा असे लोकांच्या तोंडून दबक्या आवाजात सूर निघत असल्याचे ऐकायला मिळत आहे.त्यामुळेच पठाण वस्तीतील लहान मुलापासून ते अबाल वृद्धांपर्यंत “आमचा सरपंच हिरो ला पडतोय भारी” या गाण्याची मनामध्ये रिंगटोन वाजत असणार हे मात्र नक्की..!

एवढ्या लहान गावांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून एजाज पठाण यांच्यासारखा सरपंच आमच्या गावाला लाभला व त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून गावाच्या वैभवात भर टाकली हे आमचे मोठे नशीबच असे आम्ही समजतो.

सतीश सरतापे,ग्रामस्थ
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *