श्री संत सेना महाराज यांनी उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण केले – ह.भ.प करुळे महाराज..!
पिलीव/सुजित सातपुते
धन कोणा कामा आले पहा विचारूनी भले,ऐसे सकळ जानती कळोनिया आंधळे होती,स्त्रिया पुत्र बंधू पाही,त्याचा तुझा संबंध नाही, सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण,नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दिप तेवत ठेवणारे एक थोर समाजसुधारक संत श्री सेना महाराज यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी पोटात कालवाकालव होते.उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतुन समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती.अशा या महापुरूषाचा जन्म वैशाख वद्य व्दादशी या दिवशी अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूरकडे एक फाटा जातो.त्या फाट्यावर उमरिया नावाचे एक स्टेशन आहे.तेथून एक गड दिसतो.तो गड म्हणजेच बांधवगड या ठिकाणी झाला असल्याचे ह.भ.प अजित करुळे सर रा.सराटी यांनी सांगितले.माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षीप्रमाणे सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी पिलीव,झिंजेवस्ती,बचेरी,शिंगोर्णी या गावातील नाभिक समाजाच्या वतीने करोळे महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते त्या कीर्तनात ते सांगत होते.सकाळी १० ते १२ या वेळेत संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर पोती वाचन,आरती व भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष निलेश शिंदे,उपाध्यक्ष विनायक काळे,सचिन वाघमारे,विकास देवकर,रणजीत (भैया) काळे,सारंग काळे,नितीन काळे,नंदकुमार काळे,अमोल काळे यासह नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सदरचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.