पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही प्रामाणिकपणे पक्षाचेच काम करणार : गाव तिथे भाजपा,घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम जिल्हाभर राबविणार – राहुल मदने..!

पिलीव/सुजित सातपुते


प्रादेशिक पक्षांसह सगळे राष्ट्रीय पक्ष संपतील राहील फक्त भाजपा,लोकं काँग्रेसबाबत बोलतात.४० वर्ष लागले तरी काँग्रेस भाजपासोबत उभी राहू शकत नाही.आत्ता भाजपा ज्या पद्धतीचा पक्ष आहे,तो दोन दिवसांत तयार झालेला नाही.हे सगळं संस्कारातून येतं आणि संस्कार कार्यालायतून येतो,आपल्या पक्षाची विचारधारा एवढी मजबूत आहे की नेते २०-२० वर्ष दुसऱ्या पक्षात राहिल्यानंतरही आपल्या पक्षात येत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल मदने यांनी सांगितले.मदने यांच्याकडे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पद असतानाही त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन परवाच सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी निवड केली आहे.सदर निवडीच्या संदर्भात मदने यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.गाव तिथे भाजपा व घर तिथे भाजपाचा कार्यकर्ता ही मोहीम माळशिरस तालुक्यासह जिल्हाभर राबवणार असून ज्या तरुण युवकांना भारतीय जनता पार्टीचे धोरणानुसार पक्षांमध्ये काम करण्याची इच्छा आहे.त्यांनी माझ्याशी संपर्क साधा असेही मदने यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिसरातील तरुणांना आवाहन केले आहे.गोरगरीब व गरजू लोकांना शासकीय योजना समजावून सांगून त्या शासकीय योजनांचा गरजूंना कसा लाभ मिळेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच पक्ष वाढीसाठी काम करणार असून ज्या तरुणांना समाजसेवेची आवड आहे.त्यांनाच पदे दिली जातील असे त्यांनी सांगितले पुढे म्हणाले की येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने माझी उमेदवारी डावल्ली तरीही मी पक्षावर नाराज न होता किंवा बंडखोरी न करता भारतीय जनता पार्टीने दगड म्हणून जरी एखादा उमेदवार उभा केला तरी त्याचेच काम करणार,मी उमेदवार न बघता फक्त भाजपा पक्ष व कमळ चिन्ह पाहूनच माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले.राम सातपुते यांनी पिलीव गावच्या वैभव भर टाकण्यासाठी विकास कामांसाठी भरपूर निधी दिला असून त्यांचे पिलीव सह परिसरातील गावांकडे विशेष लक्ष आहे.त्यामुळे आपल्या पिलीव गावच्या वैभवात भर टाकण्यासाठी आमदार राम सातपुते हे कटिबद्ध आहेत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी सदैव भाजपाशी एकनिष्ठ राहून काम करत राहीन असेही मदने यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

राहुल मदने हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे.तो अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिला आहे.त्याला त्या प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच मिळेल.

के.के पाटील,सदस्य जिल्हा नियोजन समिती,सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *