पिलीव येथील ग्रामस्थांनी चिखलाची दलदल असणाऱ्या रस्त्यावर स्वखर्चाने केले मुरमीकरण : विद्यार्थ्यांची,प्रवाशांची व भाविक-भक्तांची गैरसोय झाली दूर..!

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पशु वैद्यकीय दवाखान्यापासून महालक्ष्मी देवीकडे जाणार रस्ता जामदार वस्ती येथे खुप निकृष्ट झाला होता.मोठया प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असल्याने लक्ष्मी देवीला जाणारे भक्त,तसेच एक नंबर वार्डतील नागरिकांची व विद्यार्थ्यांची खूप हेळसांड होत होती.रस्त्यावर मुलांना सायकली चालवताना खूप मोठी कसरत करावी लागत होती. सदरची समस्या लक्षात घेऊन एक नंबर वार्डातील ग्रामस्थांनी मा.सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ रस्त्याचे मुरमीकरण करण्याचे योजले व लागलीच भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र करांडे,मा.उपसरपंच मोहन करांडे,मा.सरपंच उमेश बोडरे,ग्रा.पं सदस्य दत्तात्रय बोडरे,समशेरसिंग राजपूत,शरद जामदार,गजानन जनवर,अनंत जामदार,प्रमोद भैस यांनी सदरची अडचण व रस्ता करण्याची गरज लक्षात घेऊन स्वखर्चाने एका दिवसात सदर रस्त्यावर मुरमीकरण करून घेतले हा रस्ता करण्यासाठी रणधीरसिंह जामदार,श्याम उपाध्ये,विजय करांडे, यांनी सहकार्य केले.चिखलाची दलदल असणाऱ्या ठिकाणी मुरुमीकरण केल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांकडून व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *