पिलीव गावातील प्रत्येक नगरीकांच्या समस्यांचे निवारण करणारे सरपंच “नितीन विठ्ठल माळी”..!
पिलीव/सुजित सातपुते
ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषविणे,ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे,ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे,गाव पातळीवरील विविध संस्थांशी समन्वय साधून कामांचे नियोजन करणे फक्त या व अशा कामांच्या बाबतीतच आपल्याला लोकांनी दिलेले सरपंच पद मर्यादित न ठेवता माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील लोकनियुक्त सरपंच नितीन विठ्ठल मोहीते-माळी यांनी मा.सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव गावामध्ये विकास कामांचा सपाटा लावला असल्याचे पहावयास मिळत आहे.

वाड्या-वस्तीवरील रस्त्यांचे मुरमीकरण,जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घराला कसे पाणी मिळेल याचा पाठपुरावा करून काम करून घेणे,गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे खोलीकरण करून त्यास आडवी होले मारणे,प्रत्येक समाजाच्या समाज मंदिरासमोर ब्लॉक बसवणे,दलित वस्तीतील कामाला प्राधान्य देणे,पिलीवच्या मुख्य पेठेतून बंदिस्त गटारीचे स्वतः जवळ थांबून काम करुन घेणे,गावातील विजेच्या खांबावरील बल्ब बसवणे अशा किरकोळसह इतर मोठ-मोठ्या कामांमध्ये कसल्याही प्रकारचा पार्टी द्वेष मनात न ठेवता सरपंच नितीन मोहीते-माळी हे आपल्या कामातून लोकांची मने जिंकत आहेत.पिलीव मधील एखाद्या लहान मुलाने जरी फोन करून एखादी समस्या सांगितली तर त्या समस्येचे तात्काळ निवारण सरपंच करत असल्याचे पहावयास मिळत आहे.याचीच प्रचिती परवा घडून आली.साठेनगर येथील मेन चौकातील विजेच्या खांबावर डीपी स्विच बसवण्यासाठी काही दिवसापूर्वी एक लोखंडी पेटी लावली होती ती पेटी जीर्ण झाली असल्याने त्या पेटीमध्ये करंट उतरला होता.

परंतु रोजच्याप्रमाणे सायंकाळी सातच्या सुमारास लाईट लावण्यासाठी साठेनगर मधीलच ऋतुराज खरात नावाचा एक तरुण बटन टाकण्यासाठी गेला असता वायर शॉर्ट झाल्याने तिथे ठिणग्या उडाल्या व मोठा अनर्थ टळला.सदरची घटना पाहताच उपस्थित असणार्या लोकांनी सरपंच यांना संपर्क साधला असता अर्ध्या तासाच्या आत ती पेटी काढून टाकली व नवी कोरी पेटी बसवून डीपी स्वीच नवीन टाकून वीजपुरवठा सुरळीत होईल अशी व्यवस्था सरपंच यांनी केली.याच नाही तर अशा अनेक कामाची सरपंच यांची छबी पिलीवकरांना पाहायला मिळाल्याने सरपंच अधिकच लोकप्रिय ठरत चालले आहेत.त्यामुळे येणाऱ्या पुढील काळातही सरपंच म्हणून नितीन मोहीते-माळी यांनाच पिलीवकरांची पसंती राहील असे सुज्ञ मतदारांतून बोलले जात आहे.
मी पिलीव गावचा लोकनियुक्त सरपंच आहे.म्हणजेच लोकांनी मला निवडून दिले आहे.गावातील प्रत्येक नागरिकाचा मला काम सांगण्याचा अधिकार आहे व ते काम पूर्ण करण्याचे माझे कर्तव्य आहे.त्यामुळे मी निपक्षपातीपणे माझ्या कारकीर्दीत मा.सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव गावातील विकास कामे करत आलो आहे व इथून पुढेही कामे करत राहणार.
“नितीन विठ्ठल मोहिते-माळी”
सरपंच,ग्रामपंचायत पिलीव