पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जि.प प्राथमिक केंद्र शाळा याठिकाणी शिक्षीका म्हणुन कार्यरत असणाऱ्या वैशाली प्रकाश भागवत/फलके यांना शिष्यवृत्ती परीक्षेतील योगदान याबद्दल नुकताच २०२२-२३ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.वैशाली भागवत यांचे शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय व इतर स्पर्धा परीक्षेतील योगदान खूप मोठे आहे.याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा समाजकल्याण अधिकारी,महीला व बालकल्याण अधिकारी,माध्यमीकचे शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.यामध्ये माळशिरस तालुक्यातील वैशाली भागवत यांचे शिष्यवृत्ती व इतर परीक्षेतील केलेले मार्गदर्शन याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वैशाली भागवत मॅडम यांचे माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीपकुमार करडे,माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार,पिलीवचे सरपंच नितीन मोहीते,माजी जि.प सदस्य गणेश पाटील,केंद्रप्रमुख राजकुमार फासे,मुख्याध्यापक साळुंखे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव मेथवडे यांच्यासह पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडुन वैशाली भागवत मॅडम यांचे अभिनंदन व कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहेत.