आमदार राम सातपुते बस नाम ही काफी है : पिलीव येथील विद्यार्थी,व्यापारी,ग्राहक,ग्रामस्थ आ.सातपुते यांच्यावर झाले फिदा..!

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव गावामध्ये अनेक दिवसांपासून बँक ऑफ इंडिया ही एकच राष्ट्रीय कृत बँक आहे.या बँकेला पिलीव,सुळेवाडी,चांदापुरी,पठाण वस्ती,झिंजे वस्ती,कुसमोड,कोळेगाव,फळवणी,तांदुळवाडी,शिंगोर्णी,बचेरी अशी अनेक खेडीपाडी जोडली आहेत.या सर्व खेड्यापाड्यांसाठी मुख्य बाजारपेठ म्हणजे पिलीवच व्यापारी,नौकरदार,विद्यार्थी शिष्यवृत्ती,शेती अनुदान,कर्मचारी वर्गांचे पगार व व्यापारी वर्गाचे व्यवहार या सर्व गोष्टींसाठी एकच राष्ट्रीयकृत अशी बँक ऑफ इंडिया कार्यरत असल्यामुळे या सर्व गावातील लोकांना पिलीव येथील बँक ऑफ इंडिया ही सुरळीतपणे सेवा देऊ शकत नाही.खेड्यापाड्यातील मोलमजूरी करणार्यांना पैसे काढायचे किंवा भरायचे असतील तर आपला दिवसाचा रोजगार बुडवून या बँकेत येवून ताटकळत बसावे लागते.त्यामुळे याच बँकेचे ग्राहक,ग्रामस्त,विद्यार्थी अनेक दिवसांपासून दुसऱ्या बँकेची मागणी करत होते व दुसरी बँक पिलीवमध्ये व्हावी याचा पाठपुरावाही करत होते.परंतु सर्व काही निष्फळ ठरले आणि दुसरी बँक काही आजअखेर पर्यंत झाली नाही.परवा पिलीव येथे एका कार्यक्रमानिमित्त माळशिरस मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते आले असता पिलीव गावामध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक आहे.त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातील लोकांची,विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे तरी दुसरी एखादी बँक आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी पिलीव पत्रकारांच्या व ग्रामस्थांच्यावतीने आ.सातपुते यांना विनंती करण्यात आली होती.याच विनंतीला मान देऊन बघतो,करतो,सांगतो असे पोकळ अश्वासन न देता ऑन द स्पॉट इंडियन बँकेचे मुख्याधिकारी यांना आ.सातपुते यांनी पत्रकारांच्या व ग्रामस्थांच्या समोरच फोन करून पिलीव येथे बँक सुरू करण्याची मागणी केली आ.सातपुते यांच्या विनंतीला मान देऊन इंडियन बँकेचे मुख्य अधिकारी यांनी सदरचा प्रश्न लागलीच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व थोड्याच दिवसात आपल्या गावात इंडियन बँकेची शाखा सुरू करून आपल्या मतदारसंघातील पिलीव परिसरातील लोकांना अगदी सुरळीतपणे सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. आ.सातपुते यांनी बँकेला दिलेले निवेदन आज दिवसभर सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत असून पिलीवकरांच्या बँकेबाबतच्या कोमजलेल्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे पहावयास मिळाले.त्यामुळेच आ.राम सातपुते बस नाम ही काफी है!असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये इंडियन बँकेचे अधिकारी सर्व्हे करण्यासाठी पिलीवमध्ये येणार आहेत.आमदार साहेबांनी त्यांना माझ्याशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.बँकेसाठी ज्यांची जागा भाडे तत्वावरती द्यायची असेल त्यांनीही माझ्याशी संपर्क साधावा.

राहुल मदने,पिलीव

जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा.यु.मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *