पिलीव गावचे माजी उपसरंच “मोहन करांडे” व “जहांगीर शेख” यांचा नागरी आघाडी पार्टीला राम राम : जहागीरदार पार्टीमध्ये केला जाहीर प्रवेश..!

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील लोणारी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा पिलीव गावचे माजी सरपंच मोहन (तात्या) करांडे यांनी आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी मा.सभापती तथा जहागीरदार पार्टीचे सर्वेसर्वा संग्रामसिंह अजितसिंह जहागीरदार यांच्या उपस्थितीत जहागीरदार पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.मोहन करांडे यांची पिलीव परिसरामध्ये मोठी लोकप्रियता असून लोणारी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला त्यांनी नागरी आघाडी पार्टीचे काम पाहिले परंतु त्या अगोदर ते संग्रामसिंह जहागीरदार यांचे खंदे समर्थक म्हणून जहागीरदार पार्टीचे काम पाहत होते.

परंतु मध्यंतरी काळात काही कारणास्तव पार्टीतील अंतर्गत व वैचारिक मतभेदामुळे त्यांनी जहागीरदार पार्टी सोडून नागरी आघाडी पार्टीमध्ये प्रवेश केला होता.परंतु नागरी आघाडी पार्टीमध्ये त्यांनी जास्त काळ न राहता जहागीदार पार्टीमध्ये आज जाहीर प्रवेश केला त्यांना नागरी आघाडी पार्टी सोडण्याची व जहागीरदार पार्टीत प्रवेश करण्याबद्दलची प्रतिक्रिया विचारली असता मोहन करांडे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.करांडे यांच्यासोबत नागरी आघाडी पार्टीतील चाणक्य म्हणून ओळख असलेले जहांगीर शेख यांनीही जहागीरदार पार्टीत प्रवेश केला आहे.मोहन करांडे व जहांगीर शेख यांनी पार्टीला राम राम ठोकल्याने नक्कीच नागरी आघाडी पार्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असेल परंतु जहागीदार पार्टीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण झाले असल्याचे पहावयास मिळाले.पिलीव ग्राम पंचायतच्या येणार्या निवडणूकीपर्यंत कारांडे व शेख हे जहागीरदार पार्टीला नक्कीच पोषक असे वातावरण तयार करतील असे सरपंच नितीन मोहीते-माळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.प्रसंगी संग्रामसिंह जहागीरदार यांनी करांडे व शेख यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी ॲड.मानसिंह जहागीरदार,मा.जि.प सदस्य गणेश पाटील,जयसिंह जहागीरदार,ग्रा.पं सदस्या सौ.सुषमाताई जामदार,सौ.ज्योती फाळके,मा.सरपंच आप्पासाहेब लोखंडे,भाजप पिलीव शहराध्यक्ष राजेंद्र करांडे,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,मारुती देशमुख,रामचंद्र कोळी,पांडूसिंग जनवर यांसह जहागीरदार पार्टीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *