पिलीवकरांनो घाबरु नका परंतु काळजी घ्या : डोळ्याच्या संसर्गजन्य आजाराचा वाढतोय प्रसार – डॉ.विलास जाधव,वैद्यकीय अधिकारी

पिलीव/सुजित सातपुते
पिलीवसह परिसरातील नागरिकांनो जरा जपून आता डोळ्यांच्या या संसर्गजन्य आजाराचा होतोय झपाट्याने प्रसार पिलीवमध्ये डोळे येण्याची साथ पसरत असून पिलीवसह परिसरातील अनेक भागातल्या नागरिकांना सध्या याचा सामना करावा लागत आहे.कोरोनाचा कहर,मग डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा सामना केलेल्या पिलीवकरांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे.वातावरणातील बदलामुळे आधीच विषाणूजन्य आजारांनी पिलीव ग्रासले आहे.अशातच आता आणखी एक चिंता वाढली ती म्हणजे डोळे येणे.पाणीदार डोळे होणे,तसंच डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.या प्रकारची काही लक्षणं सध्या जास्त करुन लहान मुलांमध्ये दिसत आहेत.अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेत संसर्ग टाळण्याचा आणि संसर्ग झाल्यास त्यावर कोणताही घरगुती उपाय न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन पिलीव प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.डोळे येण्याचा संसर्ग सामान्यता आधी एकाच डोळ्याला होतो.मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही याचा संसर्ग होतो.त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.गेल्या आठवड्यापासून ही साथ पिलीवमध्ये झपाट्याने पसरत असल्याचे निदर्शनास आले असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं रुग्णांनी बाहेर जाणं टाळावं,असा सल्ला डॉ.जाधव यांनी दिला आहे.

काय आहेत लक्षणे –

डोळ्यांमध्ये सतत काहीतरी गेल्यासारखं वाटणे.यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येणे.डोळे लाल दिसणे आणि डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येणे.डोळे चिकट होणे,सोबतच डोळ्यांच्या आतमध्ये खाज येणे.

संसर्ग झाल्यास काय करावे –

संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करणं टाळावं आणि डोळे थंड व स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावे.या काळात प्रवास करणं टाळावं आणि हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या ठिकाणी किंवा इतरांच्या जवळ जाणं टाळावं.संसर्ग झाल्यास वेळेवर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *