खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हां माढा लोकसभेची उमेदवारी दिल्यास आम्हांला वेगळा विचार करावा लागेल – दादा शिंगाडे
पिलीव/सुजित सातपुते
पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या आजपर्यंत नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे.२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.परंतु अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी माघार घेतली व सर्वांना भ्रमात टाकले.परंतु पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला (त्यावेळी) असलेल्या माढ्यातील लढत भाजपने प्रतिष्ठेची केली होती.त्यामुळे भाजपने माढा मतदारसंघातून फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली.त्यामुळे मोहीते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीं माळशिरस तालुक्यातील काळमवाडी गावातून निंबाळकर यांना २०० मतांचे लीड दिले.व मोहीते-पाटील यांच्या कृपाशिर्वादाने निंबाळकर निवडूनही आले.परंतु निवडणूक झाल्यानंतर आणि निवडणूक आल्यानंतर आपल्याला मते दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांसाठी काम करणारा नेता म्हणजेच लोकप्रतिनिधी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची व्याख्या काय खा.निंबाळकर यांना सूट झाली नही.असा काळमवाडी गावचे माजी सरपंच दादा शिंगाडे यांनी खा.निंबाळकर यांना टोला लगावला आहे.२०१९ ला निवडून आल्यापासून खा.निंबाळकर यांनी आमच्या काळमवाडी गावाला कसल्याही प्रकारचा एक रुपयाही निधी दिला नाही.
गेल्या चार वर्षाच्या कालावधीत आमच्या काळमवाडी गावाला एक रुपयाचा सुद्धा स्थानिक विकास निधी किंवा मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कसलाही निधी त्यांनी दिला नसल्याची किंवा मिळाला नसल्याची खंत व नाराजी शिंगाडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदार फंडातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ.रामभाऊ सातपुते,मदनसिंह मोहिते-पाटील,माढा लोकसभा मतदारसंघाचे संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील,माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या विविध खात्याच्या माध्यमातून व मार्गातून आमच्या काळमवाडी गावाचा विकास साधण्याचा आम्हीं प्रयत्न केलेला आहे.व त्यातूनच विकास झाला आहे.आम्ही प्रामाणिकपणे भाजपाचे काम करीत असताना आमच्या गावाला एकदाही भेट दिलेली नाही.आम्ही वारंवार विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून मागणी व पत्रव्यवहार करूनही स्थानिक विकासासाठी निधी मिळाला नाही त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या गावातील तसेच परिसरातील नागरिकांतून,जनतेतून प्रचंड तीव्र अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.जर भाजपाने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली तर आम्हाला त्यांना मत देण्याविषयी फेरविचार करावा लागेल असा स्पष्ट इशारा शिंगाडे यांनी दिला आहे.त्याचप्रमाणे खा. निंबाळकर यांच्या विषयी जनतेतून व मतदारातून नाराजीचा सूर काढला जात आहे याचा भाजपच्या श्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे व पुन्हा खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देऊ नये अशी स्पष्ट भावना व मत लोकांमधून व्यक्त केले जात असल्याचे दादा शिंगाडे यांनी स्पष्टच बोलून दाखविले.