राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवा किंवा स्वातंत्र्य दिनी इच्छा मरणाची परवानगी द्या यशवंत पवार यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी..!


सोलापूर/प्रतिनिधी

पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षां साठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्री यांना वेळ नाही पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असल्याने पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील व गंभीर होत असून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार दखल घेत नाही राज्यातील पत्रकारांचा केवळ बातमीकरिता वापर केला जात आहे गेली अनेक वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती
राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना
अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे
पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे
पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे
खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला पन्नास लाख रुपये मदत करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता कोरोना काळात काही पत्रकारांचे निधन देखील झाले होते परंतु राज्य सरकार ने त्या पत्रकारांची शासन दरबारात पत्रकार म्हणून नोंदणी नसल्याने त्यांना शासकीय मदत मिळू शकली नाही
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहे,


राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका बजावत आहे राज्य सरकार ला पत्रकारांच्या अडचणी चा विसरू पडला असून वारंवार निवेदन व पत्रव्यवहार करून देखील राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार ला जागं येत नाही जर का राज्य सरकार राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवत नसेल तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मला इच्छा मरणाची निदान परवानगी तरी द्या अशी मागणी
पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *