किरण साठे यांच्या पाठपुराव्याला यश : पिलीव-माळशिरस एस टी बस केली चालू..!
पिलीव/प्रतिनीधी
राज्य परिवहन अकलूज आगारचे व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांना बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून माळशिरस ते,चांदापुरी,तरंगफळ, मोठेवाडी,पिलीव या मार्गाने एसटी बस सेवा चालू करण्याची मागणी केली होती.त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी एसटी चालू करण्यात आली आहे.एसटी पिलीव बस स्टॅन्ड वरती सायंकाळी ६ वाजता आल्यानंतर एसटीचे हार घालून,नारळ फोडून स्वागत करण्यात आले.यावेळी चालक राजेश गोरवे,वाहक सूरज देशमुख यांचा आणि एसटी चालू करण्यासाठी पाठपुरावा केल्याने किरण साठे यांचा पिलीव येथील नागरी आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी नागरी आघाडीचे अध्यक्ष आरीफखान पठाण,ग्रा.पं सदस्य राजेंद्रसिंग जामदार,कुमार भैस,जीवन गुरव,कुमार लोखंडे,नितीन कपने,अशोकभाऊ घोंगडे,मौला मुलाणी आदि मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस ते पिलीव एसटी बससेवा बंद असल्याने पिलीव,चांदापुरी,तरंगफळ या गावातून माळशिरस ला जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.तो आता बंद होणार आहे.किरण साठेंनी पाठपुरावा केल्याने माळशिरस पिलीव एसटी पुन्हा चालू झाली असल्याने त्यांचे पिलीवसह परिसरातून कौतुक केले जात आहे.