मैत्री लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ.निता मगर-पाटील यांचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी-आ.राम सातपुते

पिलीव/सुजित सातपुते:-
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर (महाराष्ट्र शासन अंगीकृत) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मैत्री लोकसंचलित साधन केंद्र पिलीव, हे गरीब,वंचित महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा व महिला उद्योजक बनवण्यात,त्यांनी स्वताच्या पायावर उभा राहून स्वावलंबी बनावे या उद्देशाने स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून सन 2017 पासून पिलीव परिसरामध्ये काम करीत आहे.याच अनुषंगाने मैत्री लोकसंचलित साधन केंद्र पिलीव,या कार्यालयाची आज सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा पिलीव येथील सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केली होती.प्रारंभी कार्यक्रमास माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते,पिलीव गावचे सरपंच नितीन मोहीते-माळी,माजी जि.प सदस्य गणेश पाटील,ज्योती पाटील,मा.ता.प.सं अध्यक्ष ” संजय देशमुख,जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लांमगुंडे,सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारती,तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे यांच्या शुभहस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.व त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करून

गारवड,मगरवाडी,बचेरी,पिलीव,सुळेवाडी,निमगाव,पठाण वस्ती,गोरडवाडी,जळभावी,कुसमोड,तरंगफळ,शिंगोर्णी,चांदापुरी,झिंजेवस्ती इत्यादी गावातील बचत गटांना उत्कृष्ट स्वयं साहाय्यता महिला बचत गट पुरस्कार प्रदान करण्यात आले.गेल्या सहा वर्षापासून अविरत व निस्वार्थीपणे मैत्री लोकसंचलित साधन केंद्र हे महिला सक्षमी करणाचे काम करीत आहेच परंतु नीता मामासो मगर-पाटील यांनी या साधन केंद्राच्या अध्यक्षपदाची धूरा हाती घेतल्यापासून या केंद्राची खूप गती व प्रगती वाढली आहे.मगर-पाटील मॅडम या आपल्या टिमच्या माध्यमातून कसलीही मनात संकुचित भावना न ठेवता पिलीवसह परिसरातील गोरगरीब व वंचित महिलांसाठी,त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्या झटत असल्यामुळे त्या सुशिक्षित महिलांचा आयडॉल ठरल्या असून इतर महिलांनी ही त्यांचा आदर्श घ्यावा असे आमदार राम सातपुते यांनी आपल्या मनोगतातून निता मगर-पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले.व उपस्थित महिलांनी मगर-पाटील यांचा आदर्श घेवून समाजसेवेसाठी स्वताला झोकून घेण्याचे अवाहन केले.सोमनाथ लांमगुंडे व रणजित शेंडे यांनी उपस्थित महीलांना मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभाकर भगत यांनी केले.आभार प्रदर्शन शोभा वाघमारे व प्रमिला गोंजारी यांनी तर सुत्र संचालन गौरी गावडे यांनी केले.कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी निता मगर-पाटील यांनी कार्यालयाच्या जागेसाठी व इमारतीचे बांधकाम करण्यासाठी आमदार राम सातपुते यांना निधीची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *