पिलीव बसस्थानकावर बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड :आमदार राम सातपुते यांना पत्रकारांचे निवेदन..!
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सातारा-सोलापूर यांसह काही अपवाद वगळता इतर बस थांंबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आसलेल्याबाबतचे आज महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सुजित दिगंबर सातपुते यांनी यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राम सातपुते यांना निवेदन दिले.


सातारा-सोलापूर ही बस पिलीव येथे अधिकृत थांबा असताना सुद्धा थांबत नसून या बसचे चालक व वाहक हे प्रवाशांबरोबर उद्धटपणे वागतात.काही बसेस पिलीवमध्ये न थांबविता फुकटच्या चहापाण्याची व नाष्ट्याची सोय होते म्हणून एकतर सुळेवाडी घाटाच्यावरच्या बाजूला एका हॉटेलवर अन्यथा तांदुळवाडी या गावांमध्ये ही बसेस थांबविल्या जातात.परंतु यांच्या या हलगर्जीपणाचा फटका पिलीव येथील जवळपास ३० ते ३५ विद्यार्थ्यांना बसत आहे.पिलीव व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भाळवणी व पंढरपूर येथे जातात.ते पिलीव बस स्थानकावर ८:३० च्या सुमारास सातारा-सोलापूर या बसची वाट पाहत असतात.परंतु ८:३० वाजता येणारी बस ९:०० च्या दरम्यान पिलीवमध्ये येथे व पिलीव येथे न थांबताच निघून जाते.यामुळे विद्यार्थ्यांची व प्रवाशांची रोज गैरसोय होत असल्याचे पहावयास मिळत आहे.तरी आपण सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालावे व संबंधित बस चालक वाहकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिलीव बस स्थानकावर अधिकृत थांबा आहे तिथेच बस थांबाविण्याची व्यवस्था करावी अशा स्वरुपाचा मजकूर आमदार राम सातपुते यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केला आहे.सदर निवेदनावरती पत्रकार दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील,प्रमोद भैस,शाहरुख मुलाणी,गणेश देशमुख आदि पत्रकारांच्या स्वाक्षर्या आहेत.