अनेक दिवसांपासून फरार असलेला आंतरजिल्ह्यातील अट्टल व सराईत गुन्हेगार रुईया उर्फ सुरज जाधव माळशिरस पोलीसांच्या ताब्यात – पोनि राजेंद्र टाकणे

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर मधील गोरेवस्ती येथे राहणारे नंदकुमार धनाजी बोराटे हे दिनांक ७ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वा.सुमारास पुरंदावडे गावातून भांबुर्डे गावाकडे जाणाऱ्या रोडवरुन आपल्या घराकडे निघाले असता रुईया उर्फ सुरज जाधव रा.जाधव वाडी ता,माळशिरस व अजय आढाव रा.मेडद ता, माळशिरस यांनी नंदकुमार बोराटे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता बोराटे यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले परंतु आरोपींनी त्यांचे काही ऐकून न घेता तुझ्याकडे पैसे कसे नसतात म्हणून शिवीगाळ,दमदाटी करून बोराटे यांच्या पॅन्टचे खिसे चेक करून बघितले तरीसुद्धा आरोपींना पैसे मिळाले नाहीत.त्यामुळे बोराटे यांना हाताने,लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने चेहऱ्यावर,दोन्ही हातावर,दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या खाली म्हणजेच नडगीवर वार करून गंभीर जखमी केले.त्यानंतर बोराटे यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे वरील दोन आरोपींवर गुन्हां रजिस्टर नंबर ३६८/२०२३ भादंवि कलम ३०७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हां दाखल केला.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर हे करीत होते.सदर गुन्ह्यांतील दोन्हीं आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर पुणे,सातारा,सांगली,सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहीती पोलीसांनी उघड केली व माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी आरोपींना अटक करण्यासाठी अनेक गावांतून वेगवेगळ्या पध्दतीने गोपनीय माहिती घेऊन आरोपींचा शोध घेतला परंतु आरोपी काही करता मिळत नव्हते.गेल्या दोन दिवसापूर्वीच पोलीसांना माहीती मिळाली की आरोपी सुरज जाधव हा बाळुमामाची मेंढरे राखण्याकरिता गेलेला असून कोणत्यातरी गावामध्ये मेंढरांच्या कळपाबरोबर आहे.या माहीतीच्या अधारे टाकणे यांनी तपासाची सुत्रे फिरवून तपास पथकाला विशेष सुचना दिल्या व बाळूमामांच्या मेंढरांच्या कळपांचे कारभारी यांच्याशी संपर्क साधून सायबर शाखेच्या तांत्रिक विश्लेषणाच्या अधारे आरोपींबाबत माहीती संकलित केली असता सुरज जाधव हा आरोपी सांगोल तालुक्यातील ठोंबरेवाडीमधील लक्ष्मीनगर येथे मेंढरांच्या कळपात चाललेले किर्तन ऐकत बसला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने तपास पथकाने मेंढपाळाचे वेशांतर केले व आरोपीच्या बाजूला बसूनच त्याला सापळा रचून अगदी शिताफीने पकडले व त्यास वरील गुन्ह्यांत अटक केली. सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,हिम्मतराव जाधव अप्पर पोलीस अधीक्षक,डॉ.सई भोरे-पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज,राजेंद्र टाकणे पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन घोळकर,सपोनि.दत्ताजीराव मोहिते,पोसई एम.एम पुजारी,घोगरे,सायबर किंग दत्ता खरात,मारुती शिंदे,अमित जाधव,धीरज काकडे, पोलीस मित्र शंकर कोळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *