माळशिरस तालुक्यात रिपाइं आठवले गट ॲक्शन मुडमध्ये:चंदापूरी गावात रिपाइं आठवले शाखेचे उद्घाटन…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदपुरी येथे चांदापुरी गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शाखेचे उद्घाटन रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदासजी आठवले यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.रिपब्लिकन पक्षाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे.यासाठी माळशिरस तालुका कार्यकारिणीच्या वतीने गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून मळोली, तांदुळवाडी,फळवणी,
कोळेगाव,कुसमोड,पिलीव, बचेरी,शिंगोर्णी,या गावांना भेटी देऊन सायंकाळी चांदापुरी येथे रिपाइं शाखा नमफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी युवक आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे,जिल्ह्याचे नेते एस.एम गायकवाड,आबा बनसोडे तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर,ता.कार्याध्यक्ष समाधान भोसले,युवक आघाडी तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे,तालुका संघटन सचिव पोपट गेजगे,तालुका कोषाध्यक्ष समीर सोरटे,उपाध्यक्ष शेखर सावंत,संघटक प्रकाश गायकवाड,उपाध्यक्ष संतोष कांबळे,युवक ता.सचिव राजरत्न नाईकनवरे,सरपंच जयवंत सुळ,उपसरपंच तात्यासो चोरमले,केशवराव पाटील,डॉ.कुमार लोंढे,दिलीप सरतापे,अण्णासाहेब भोसले,दादासाहेब सरतापे,अरूण बोडरे,शिवाजी देठे,सतीश गायकवाड,आप्पा सावंत,कुमार गायकवाड,राजू खरात,गणेश बनसोडे,हंबीर जाधव,सत्यवान देठे,दिनेश गाडे,अनिल देठे उपस्थित होते.याप्रसंगी अध्यक्षपदी प्रवीण देठे,उपाध्यक्षपदी रणजीत आप्पा सरतापे,खजिनदारपदी जयराम सातपुते,सचिवपदी संजय भोसले यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब भोसले यांनी केले.