सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशानूसार पोनि राजेंद्र टाकणे यांच्या टिमची दमदार कामगिरी : पिलीवसह परिसरातील एकुण वीस गुटखा विक्रित्यांवर कारवाई…!
पिलीव/प्रतिनीधी
आपल्या गावातील शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर सिगारेट,तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ अंतर्गत (कोप्टा) बंदी आहे. तरीसुद्धा शाळांबाहेर खुलेआम मावा,गुटखा विक्री होते.त्यासंदर्भात सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार कालपासून जिल्हाभर विशेष मोहीम राबवून टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोप्टा कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यात आला आहे.तसेच व्यापार,वाणिज्य,नियमन आणि उत्पादन व पुरवठा,वितरणावर देखील बंदी घालण्यात आली आहे.विशेषतः शाळांमधील मुलांना व्यसनाची सवय लागू नये या हेतूने शाळांच्या १०० मीटर अंतरात अशा पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे.आता शाळा परिसरासह प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पानटपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.याच अनुषंगाने माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव औट पोस्टच्या हद्दीतील गुटखा विक्री करणार्या टपर्यांवर धाडी टाकून एका दिवसात तब्बल एकुण २० टपरी चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील,माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव औट पोस्टचे पोउनि एम.एम पुजारी,अभिजीत कणसे,पंडीत मिसाळ,अमित जाधव,दत्ता खरात,सतीश धुमाळ यांनी केली.या कामगिरीबद्दल पिलीव औट पोस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पोनि राजेंद्र टाकणे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले असून गुटखा विक्रित्यांना गुटखा विक्री बंद करण्याची तंबी दिली आहे.