समृध्दी महामार्ग दुर्घटनेतील सर्वजण महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याने त्यांच्यासोबत भेदभाव होऊ नये-वैभव गिते

पिलीव/सुजित सातपुते

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या सरलांभबे गावाजवळ पुलाचं बांधकाम सुरू असताना, एक गर्डर मशीन कोसळल्याने ही घटना घडली आहे.


दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर गेला असून घटनेची माहिती मिळताच नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उपस्थितांशी चर्चा केली तसेच समृद्धी महामार्गावर काम करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांशी सुद्धा चर्चा केली
त्यानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन गंभीर
जखमींची भेट घेण्यासाठी वैभव गिते हे सरकारी जिल्हा रुग्णालयात पोहचुन 33 वर्षीय प्रेम प्रकाश यांची भेट घेतली.
या दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. ते मुळचे बिहारचे असून घरी आई, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत.
आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते मजुरीच्या कामासाठी आले होते. डिसेंबर 2022 पासून ते व्हिएसएल या कंपनीसाठी मजूर किंवा हेल्पर म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.

त्याचवेळी ते शहापूरला आले.


“माझ्या पायाला खूप लागलं आहे. पाय उचलू शकत नाहीय. अचानक पूर्ण लाँचर खाली आलं. काय झालं हे कळायच्या आतच दुर्घटना झाली होती.आम्ही सगळे लाँचरवर होतो.आम्हाला गावातील ग्रामस्थांनी मदत केल्याची माहिती प्रेम प्रकाश यांनी वैभव गिते यांना दिली
वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन माहिती घेतली असता
घटनेत 20 जण मृत झाले असून
20 जणांची नावे कळली आहेत. या 20 जणांची नावं खालीलप्रमाणे आहेत
मृतांची नावे
1 )अरविंदकुमार उपाध्याय 33 उत्तर प्रदेश
2)गणेश रॉय 40 पश्चिम बंगाल
3)ललन राजभर 38 उत्तर प्रदेश
4)परमेश्वर सहानी 25 उत्तर प्रदेश
5)नितीनसिंह विनोदसिंह २५ उत्तरप्रदेश
6मनोजसिंह यादव 49 बिहार
7)संतोष इलागोवन 36 तामिळनाडू
8)राधेश्याम यादव 40 उत्तर प्रदेश
9)आनंदकुमार यादव 25 उत्तर प्रदेश
10)पप्पूकुमार साव 20 बिहार
11)कनन वेदर्थीनम 23 कर्नाटक
12)सुब्रोत सरकार 23 पश्चिम बंगाल
13)सुरेंदर पासवान 35 उत्तर प्रदेश
14)बलराम सरकार – पश्चिम बंगाल
15)लवकुश रामुदिन सावुकुमार 28 बिहार
16)प्रदीपकुमार रॉय 44 पश्चिम बंगाल
17)मंगेश शर्मा 34 उत्तराखंड
18)सत्यप्रकाश पांडे 30 बिहार
19)रामाशंकर यादव 46 उत्तरप्रदेश
20)सरोजकुमार जगदीशकुमार 18 उत्तरप्रदेश
हे सर्वजण महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील मजूर आहेत.
जखमींना शहापूरच्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रिकास्ट केलेला कॉलम फिट करताना हा अपघात झाल्याच प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
समृद्धी महामार्ग
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील.असंही सांगितलं जात आहे.701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
समृध्दी महामार्ग शहापूर दुर्घटनेतील मृत व जखमी सर्वजण महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याने मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली मदत व शासनाची इतर मदत त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे.परप्रांतीय असल्याने त्यांच्यासोबत व त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी
या सर्व कामगारांचा विमा काढला होता काय?शासनाच्या नियमांचे पालन केले होते काय?याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी असे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाउराव तायडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *