श्री महालक्ष्मीच्या आवारातील प्रश्न सोडविण्यासाठी राम आला धावून : पिलीव परिसरातील भक्त गेले आनंदात न्हाहून..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील पिलीव येथील जागृत असलेले श्री महालक्ष्मी देवस्थान येथे दरवर्षी भरणाऱ्या व १५ दिवस चालणाऱ्या यात्रेला सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातूनही लाखो भाविक येतात.परंतु या ठिकाणी दरवर्षी मूलभूत सुविधांची उणीव भासत असते.त्यामुळे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे पहावयास मिळते.देवस्थानची २०० एकर जमीन असूनही यातील बहुतांश जमिनीवर आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे अत्यंत कमी जागेत यात्रा पार पडते,भाविकांचे हाल होतात.यामुळे भविष्यात एखादी मांढरदेवीसारखी दुर्घटना किंवा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली आहे.या पार्श्‍वभूमीवर यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून यात्रेचे योग्य नियोजन करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाला देणार का ? तसेच देवस्थानच्या २०० एकर जमिनीसंदर्भात महसूल प्रशासनाची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार का ? अशा अशयाचे अनेक प्रश्न माळशिरस विधान सभेचे कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते यांनी सभागृहात विचारले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करून त्यांना भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना देण्याचे तसेच देवस्थानच्या जमीनीसंदर्भात माहिती घेऊन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.सदर मागणीकेल्याचा आमदार राम सातपुते यांचा सभागृहातील व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्याने आमदार राम सातपुते यांचे पिलीवसह परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने कौतुक होत असून त्यांनी केलेल्या मागण्या अगदी रास्त असल्याचे जाणकार मंडळीतून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *