यश पिसे यांच्या पाठपुराव्याला यश : शिंगोर्णी येथे झाले बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी या गावांमध्ये एखादी बँक व्हावी अशी अनेक दिवसापासूनची शिंगोर्णी गावातील ग्रामस्थांची मागणी होती.याच मागणीचा विचार करत सांगोला तालुक्यातील बँक ऑफ इंडिया शाखा कटफळ येथील शाखाधिकारी जयसिंह पाटील यांनी यश निवृत्ती पिसे यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक घेऊन फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ग्राहक सेवा केंद्राला म्हणजेच मिनी बँकेला मान्यता दिली.याच मिनी बँकेचे काल बँक ऑफ इंडिया कटफळ शाखेचे शाखाधिकारी जयसिंह पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.केवळ यश निवृत्ती पिसे यांच्यामुळे शिंगोर्णी परिसरातील लोकांची होणारी हेळसांड थांबली आहे.अनेक लोकांना दहा-पाच हजार रुपये काढण्यासाठी किंवा दहा-पाच हजार रुपये खात्यावर जमा करण्यासाठी कटफळ किंवा पिलीव असे दहा-बारा किलोमीटरचे अंतर मोजावे लागत होते.अनेक गोर-गरीब व मोल-मजूरी करणार्या मजूरांना रोजगार बुडवून हेलपाटे मारावे लागत होते.परंतु पिसे यांच्या पाठपुराव्यामुळे शिंगोर्णी गावाला मिनी बँक मिळाल्याने पिसे यांचे शिंगोर्णी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने कौतुक व अभिनंदन होत आहे.सदर मिनी बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी हनुमंत पिसे,पोलीस पाटील अण्णासाहेब शिकारे,शिंगोर्णी गावचे सरपंच अक्षय धांडोरे,बचेरी गावचे सरपंच राणीताई गोरड,ग्रा.पं सदस्य भाऊसाहेब गोडसे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.