मेडद येथील शेतकर्याला 25 लाखाला गंडा घालणाऱ्या टोळीस माळशिरस पोलिसांनी केले 24 तासात जेर बंद : पोनि राजेंद्र टाकणे यांच्या टिमची दमदार कामगिरी..!

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील मेडद येथील शेतकरी नामदेव जयराम वळकुंदे यांना 25 लाखात दोन हजार रुपये चलनाचे 1.25 कोटी रुपये देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडील चालू चलनातील 25 लाख रुपये घेऊन 1.25 कोटी न देताच अज्ञात आरोपी पसार झाल्याने वळकुंदे यांनी माळशिरस पोलिसात अज्ञात आरोपींवर 384/2023 भा.द.वि कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एम पुजारी यांच्याकडे देऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी सदर आरोपींच्या शोधा करिता तात्काळ तपास पथक तयार केले.आरोपींनी आपल्याकडील मोबाईल बंद केल्याने आरोपींचा शोध घेणे अशक्य होते.परंतु तपास पथकाने उपलब्ध माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी बाबत खात्रीशीर माहिती घेतली असता सदर आरोपी हे संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तपास पथकाने बुलढाण्याकडे धाव घेतली व स्थानिक पोलिसांची मदत घेऊन गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह तपास पथकाने आरोपींना सापळा रचून जागीच पकडले त्याच ठिकाणी त्यांच्याकडून एकूण 17 लाख 65 हजार रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना जागेवरच अटक केली.कोणताही सबळ पुरावा अथवा धागे-दोरे नसतानाही इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन पिडीत शेतकऱ्याला रक्कम परत केल्याने पोनि राजेंद्र टाकणे,पोउनि एम.एम पुजारी यांचे वरिष्ठ अधिकार्यांकडून कौतुक होत आहे.सदरची कामगिरी शिरीष देशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,हिम्मतराव जाधव अप्पर पोलीस अधीक्षक,डॉ.सई भोरे-पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग,राजेंद्र टाकणे पोलीस निरीक्षक माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.एम पुजारी,पोना दत्ता खरात,पोना राहुल वाघ,धीरज काकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *