पिलीव येथील भाजपाने दिलेला रास्ता रोकोचा इशारा म्हणजे राजकीय स्टंटबाजी : नागरी आघाडी पार्टीच्या नेत्यांचा आरोप…!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अहील्या चौकातील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासुन रखडलेले आहे.यासाठी पिलीव शहर भाजपच्या वतीने सदर रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण व्हावे म्हणून १ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करणार असल्याचे निवेदनाद्वारे प्रसिध्दीपत्रक काढले आहे.यावर विरोधी नागरी आघाडीच्या वतीने हा रास्ता रोको ही केवळ राजकीय स्टंटबाजी असुन गल्ली ते दिल्ली यांची सत्ता असताना यांनी गेल्या चार वर्षात रास्ता रोको का केला नाही.असा आरोप केला आहे.नागरी आघाडीने अहील्या चौकातील रखडलेले रस्त्याचे काम पुर्ण करावे म्हणून एम.एस.आर.डी.सी पुणे,रोडवेज कंपनी,माळशिरस तहसीलदार, प्रांताधिकारी,पोलीस निरीक्षक माळशिरस यांना २०/६/२०२२ रोजी लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यांनतर सदरच्या कंपनीने पुलाचे काम व इतर काम पुर्ण केले आता फक्त रस्ता व गटारीचे काम अपुर्ण आहे.त्यासाठी आम्हाला सदरच्या नवीन काम दिलेल्या कंपनीने फक्त दहाच दिवसात सदरचे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे नागरी आघाडीचे आध्यक्ष अरीफखान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सदरचे काम होणार आहे हे लक्षात येताच सत्ताधारी पार्टीने याचे श्रेय नागरी आघाडीला जाईल या भितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.गेली तिन चार वर्षे याठिकाणी इस्टीमेट मध्ये पुल नसताना पुल व्हावा अशी मागणी करीत यांनीच काम रखडविले आहे.आणि आता निवडणूक जवळ आली आहे म्हणून आंदोलनाची स्टंट बाजी करीत आहेत असाही माजी सरपंच अमोल मदने यांनी आरोप केला.गटारीचे पाणी चौकातील विहरीत सोडले आहे त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे धुळीचे साम्राज्य पसरले आहे याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असुन सत्तेत असतानाही काहीच केले नसल्याचे संग्राम पाटील व मोहन करांडे यांनी बोलून दाखविले.
यावेळी माजी उपसरपंच नानासाहेब देशमुख,ग्रा.पं सदस्य राजेंद्र जामदार,जिवन गुरव,संतोष बगाडे,कुमार भैस,कल्याण जावळे,शिवराज पुकळे,विजय पिसे,कुमार लोखंडे,वैभव पिसे,अजय खुर्द,अक्षय वगरे,संजय रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित उपस्थितीत होते.