श्रीमती वैशाली भागवत यांनी पिलीव येथील जि.प.प्रा शाळेला दिली नव संजीवनी : केवळ एका शिक्षिकेमुळे पालकांची मराठी शाळेला पसंती..!
पिलीव/सुजित सातपुते
आजच्या व्यावहारिक जगात सगळ्याच क्षेत्रांचा बाजार झाला आहे.त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही.मात्र सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील पिलीव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मुले येथील मराठी शाळेत अशा एक शिक्षिका आहेत.ज्यांनी ती शाळा बंद होण्यापासून वाचवली शिवाय या शाळेला एक वेगळी ओळखही त्यांनी मिळवून दिली आहे.आपली शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा बनावी हे ध्येय त्यांनी उराशी बाळगले असून त्यासाठी त्या अगदी मनापासून त्या काम करत आहेत.त्या शिक्षिकेचे नाव आहे “श्रीमती वैशाली प्रकाश भागवत-फलके” आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठी शाळांकडे पाठ फिरविण्याचे आणि मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढलेले असताना या मराठी शाळेला नव संजीवनी देण्याचे आदर्शवत काम या शिक्षिकेने केले आहे.
नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत एकुण १७ विद्यार्थी बसले होते.ते १७ विद्यार्थी पास झाले तर ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.या पुढे जावून सांगायचे म्हणले तर संपुर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ही एकमेव अशी शाळा आहे की ज्या शाळेच्या एकुण ५ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.भागवत मॅडम पिलीव शाळेत येण्यापूर्वी या शाळेची दुरवस्था झाली होती.शाळेच्या इमारतीची कवले खाली उतरली होती.ती काही ठिकाणी पडण्याच्या स्थितीत होती.कौले फुटली होती.त्यामुळे पावसाचा जलाभिषेक मुलांना होत होता.वर्ग खोल्यांमध्ये असलेल्या फरश्याही फुटल्या होत्या आणि शाळेतील मुलांची संख्या अवघी अंदाजे ३०० एवढीच होती.एखादी शाळा सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची १२ निकष असतात. त्यातील दोन-चार निकषांचा अपवाद वगळता उर्वरित निकष पूर्ण नसल्याने ही शाळा बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.ही शाळा बंद झाली असती तर
यांना अन्य शाळेत बदली मिळाली असती मात्र गावाच्या हितासाठी आणि शाळेत येणाऱ्या त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी ही शाळा बंद पडू द्यायची नाही.असा निर्धार या भागवत मॅडमनी केला.इमारतीच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडून मिळणारे वार्षिक अनुदान अपुरे असल्याने अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी त्यांनी गावातून लोकवर्गणीतर केलीच परंतु पदरमोड करुन इतर शिक्षकांनीही देणगी दिली.यामुळे इमारत आणि परिसराचे सुशोभीकरण व रंगरंगोटी झाली.काही दानशूर व्यक्तींनी शालोपयोगी साहित्यही शाळेला दिले.एवढे सगळे झाले तरी पुरेशा पटसंख्येअभावी शाळा बंद होण्याची टांगती तलवार शाळेवर होतीच. ठरावीक कुटुंबांतील मुले सोडल्यास गावातील सर्व मुले परिसरातील इतर शाळांत शिकत होती.त्यांच्या पालकांचे मन वळविण्याचा विडा या भागवत मॅडम यांनी उचला ही शाळा तुमचीच असून आम्ही केवळ सांभाळतोय.हे सगळे वैभव तुमचे आहे.असा विश्वास गावातील लोकांमध्ये निर्माण केला.त्यानंतर पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.ते शाळेत येऊ लागले आणि इथे काहीतरी चांगले घडत आहे.याची खात्री त्यांना पटली. ग्रामस्थांचे खूप चांगले सहकार्य मिळू लागले.दरम्यानच्या कालावधीत शाळेतील मुलांची संख्या कमी होती परंतू नंतर इयत्ता पहिलीच्या दोन-दोन तुकड्या कराव्या लागल्या.आता गावातील सर्व लहान मुले मराठी शाळेत येतात.अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे नाव चांगल्या खासगी शाळेतून काढून या शाळेत घातले.या शाळेतील मुले खासगी शाळेतील मुलांशी अभ्यासाबरोबरच इतरही बाबतींत स्पर्धा करत आहेत.त्या स्पर्धेत टिकत आहेत आणि स्वतःला सरस सिद्ध करत आहेत.ते केवळ आणि केवळ फक्त श्रीमती वैशाली भागवत यांच्यामुळेच असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
अजूनही या शाळेसाठी खूप काही करायचे शिल्लक आहे.आमची शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा बनेल या दृष्टीने मी व माझ्या सहकारी शिक्षिका अगदी प्रामाणिकपणे काम करतोय.
श्रीमती वैशाली भागवत”
चौकट
राज्यातल्या मराठी शाळांवर संक्रांत येत असताना एका गावातील ही शाळा टिकवण्यासाठी या वैशाली भागवत यांनी निस्वार्थीपणे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.त्यांच्या या धडपडीला सलाम.
आमदार राम सातपुते,माळशिरस विधानसभा