फुकटच्या नाष्ट्यासाठी ST कर्मचाऱ्यांचा अधिकृत थांब्याला खो : पिलीव बसस्थानकावर ST बसेस थांबत नसल्यामुळे प्रवासी संतप्त..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव हे मुख्य गाव असुन आसपासच्या दहा-बारा गावातील नागरिकांसाठी या ठिकाणी मुख्य बसस्थानक आहे.पुर्वी पासुन या ठिकाणी प्रत्येक ST बस ही दहा-पंधरा मिनिटे थांबल्याशिवाय पुढे जातच नसत.मात्र गेल्या अनेक दिवसांपासुन काही आपवाद वगळता इतर ST कर्मच्यार्यांनी फुकटचा चहा व नाष्टा मिळतोय म्हणून अधिकृत ठिकाणी न थांबता अनाधिकृत ठिकाणी ST थांबविण्याचा गोरख धंदा चालू केला आहे.सध्या ज्या ठिकाणी ST थांबतात त्या ठिकाणी अधिकृत थांबा नाहीच.परंतु केवळ बसचालक व कंडक्टर यांना फुकटचा चहा व नाष्टा मिळत असल्यामुळे हे महाशय महामंडळाची परवानगी नसतानाही या ठिकाणी पंधरा-विस मिनिटे बस थांबवत आहेत.सातारा,सोलापूर व पंढरपूर या आगाराच्या बसेस या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आहेत.परंतु या बसचालक,वाहक यांच्या मनमानी कारभारामुळे पिलीव या बसस्थानकावर अनेक ST बसेस सध्या थांबतच नाहीत तर काही महाशय बसस्थानक सोडुन दुरवर बस थांबवित आहेत.यामुळे पिलीव येथील प्रवासी तसेच विद्यार्थी यांना तासनतास बसस्थानकावर चक्क ताटकळत बसावे लागत आहे. दोन-तीन तास चक्क रस्त्यावर थांबुनही बसच थांबत नाही.अशी परिस्थिती सध्या पिलीव येथील प्रवासी वर्गाला अनुभवायला मिळत आहे.जर का याठिकाणी ST बस थांबविली नाही तर आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे करणार असल्याचे प्रवासी वर्गामधुन बोलले जात आहे.याविषयी सोलापूर, पंढरपूर व सातारा आगाराने दखल घेऊन प्रवाश्यांची होणारी गैरसोय ताबडतोब टाळावी अशी मागणी पिलीव परीसरातील प्रवाश्यांमधुन होत आहे.सदर प्रकारामुळे आज दुपारी प्रवासी वर्गामधुन उद्रेक दिसुन आला प्रवासांनी लातुर-वाई ST बस रोकून आंदोलन केले.मात्र या बस मध्ये एकही प्रवासी घेतलाच नाही.
#पिलीव येथील ॲड.वैभव मेथवडे यांना या विषयी विचारले असता रविवारी मी मुलांसह दहीवडी गावाला जाणयासाठी थांबलो असता दुपारी एक-दीड वाजेपर्यंत एकाही बस चालकाने पिलीव बसस्थानकावरील एकही प्रवासी घेतला नाही.एवढी विचीत्र परिस्थिती सध्या याठिकाणी पहावयास मिळत असल्याचे मेथवडे यांनी सांगितले.