पतीच्या अपघाती मृत्यूनंतर बँक ऑफ इंडियाकडून पिलीव येथील जयश्री लोखंडे यांना मिळाले दोन लाख रुपये..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील संजय पांडुरंग लोखंडे वय अंदाजे ४५ वर्ष यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते.संजय लोखंडे यांचे पिलीव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये चालू सेव्हींग्जचे खाते होते.सदरच्या खात्यामधून पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंतर्गत वर्षाला २० रुपये प्रीमियम याप्रमाणे पैसे कट झाले होते.म्हणजेच संजय पांडुरंग लोखंडे यांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वर्षाला २० रुपये प्रमाणे पैसे भरून बँकेचे बिझनेस करस्पाउडंट ऋषिकेश बाळूसिंग भैस यांच्याकडे अपघाती विमा उतरवला होता.त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच बँक ऑफ इंडियाचे तात्कालीन मॅनेंजर विजय नाईक यांनी संजय लोखंडे यांच्या पत्नी जयश्री लोखंडे यांना बँकेमध्ये बोलावून घेऊन सदरच्या योजनेबद्दल माहिती सांगितली व पोलीस एफ.आय.आर,पी.एम रिपोर्ट,पासबुक झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स व पॅन कार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांची मागणी करून जयश्री लोखंडे यांना पैसे मिळवून देण्याच्या सकारात्मक बाजूने पाठपुरावा केला.आज सोमवार दिनांक २४ जुलै रोजी जयश्री लोखंडे यांच्या खात्यावर सदर विम्याची दोन लाख रुपये रक्कम जमा झाली ती रक्कम बँकेचे मॅनेंजर योगेंद्र सी.एच,जॉन सुंदर,विनोद मोरे,राजेंद्र मोठे,अमित गांधी,ऋषिकेश भैस यांच्या हस्ते जयश्री लोखंडे यांना सुपूर्द करण्यात आली.यावेळी सर्वच बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वर्षाला २० रुपये प्रमाणे प्रीमियम भरून घ्यावा असे बँक मॅनेंजर युगेंधर सी.एच यांनी आवाहन केले.सदर योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासत नाही.फक्त आपल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये खाते उघडा व वर्षाला २० रुपये प्रमाणे प्रीमियम भरून आपला विमा उतरवून घ्यावा असेही यावेळी सयूगेंधर सी.एच यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *